ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

हिरकणी चे मनोगत ….

April 28, 202213:28 PM 39 0 0

मॅडम आम्हाला खरंच माहेरी आल्यासारखं वाटलं. अजिबात थकवा आला नाही .कोणत्याही प्रकारे आम्हाला तुम्हा  उभयतांनी कसलीच कमी पडू दिली नाही. आपण माहेरी गेल्यानंतर जसे माहेरचे आपली काळजी घेतात तसेच खरोखर तुम्ही आम्हा सर्वांची खूप काळजी घेतली. आम्ही उतरल्यापासून ते घरी येईपर्यंत आम्हा सर्वांची तुम्ही विचारपूस केली. पूर्णपणे उत्तम सोय केली. कुठेही कुठल्याही प्रकारची आम्हाला उणीव भासली नाही. हा महोत्सव आम्ही पनवेल येथे घेणार होतो परंतु काही कारणास्तव तो आम्ही घेऊ शकलो नाही पण असे वाटते की आम्ही पनवेलला घेतलं नाही तेच योग्य होते.कारण आम्हाला आमच्या माहेरी जाता आलं नसतं. आम्हाला पूर्णपणे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली माझ्या बाकीच्या सर्व महिला मैत्रिणी पत्रकार यांनी  हा सुखाचा क्षण त्यांनी त्यांच्या हातून  गमावला असं वाटते .सर आम्हाला नेहमी वेळोवेळी जी मदत करतात त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत .फक्त पत्रकारच नव्हे तर इतर सर्व क्षेत्रात आम्ही पुढे जावे त्यासाठी नेहमी धडपड करत असतात.

कोणताही यामध्ये त्यांचा स्वार्थ नसून ते आम्हा सर्व मैत्रिणींना कुठे काय करावे, कसे लिहावे, कसं बोलावं, कोणाला भेटावे,असे मार्गदर्शन आम्हा सर्वांना करत असतात. माझ्या सामाजिक क्षेत्रांमध्ये त्यांनी भर पडावी अशी खूप मदत आम्हाला वेळोवेळी केली. असे आजपर्यंत कधीही कोणी मला मदत केली नाही. मदत केली असेल तर ती स्वार्थ ठेवूनच केली. परंतु सरांनी यांची आज पर्यंत जी मला मदत केली त्यामुळे आयुष्यभर मी त्यांची ऋणी असेल .ज्याप्रकारे भाऊ आपल्या बहिणीच्या मागे नेहमी उभा असतो त्याप्रमाणे सर माझ्या नेहमी भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभी राहिले आहे आणि पुढे देखील उभे राहतील याची मला पूर्णपणे खात्री आहे. कौतुक करावे तितके त्या दोघां उभयतांचे कमी आहे शब्द अपुरे पडतात. सर आपण जी आमच्यावर जबाबदारी देता आहात त्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू आपल्या अष्टभुजा हिरकणी ला उंच शिखरावर पोचवण्याचं जे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे त्यासाठी आम्ही सर्व टीम प्रयत्न करू. मॅडम आम्ही तुमच्या घरी आलो नाही असं म्हणू नका कारण आम्हाला असे वाटत की आम्ही तुमच्या घरी येऊन गेलो.

यूकॅम चे पण कौतुक कारण दिवसभर त्यांने कोणताही प्रकारचा त्रास दिला नाही तुम्ही सर्वजण आमच्या उरण ला नक्की या आम्हाला देखील खूप आनंद होईल पुनश्च एकदा आम्हा सर्व टीमकडून तुम्हा दोघा उभयतांचे मनःपूर्वक धन्यवाद

सौ.संगीता ढेरे
उरण रायगड

 

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *