ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महिला दीना निमित्त धुतूम ग्रामपंचायतचा एतिहासिक निर्णय

February 28, 202214:20 PM 59 0 0

उरण  (राघवी ममताबादे ) :  दिनांक 22/02/2022 रोजी झालेल्या मासिकसभा व महिला ग्रामसभेत महिला दीना निमित्त धुतूम ग्रामपंचायतने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.25000 रुपयाची 21 वर्षासाठी एफडी करून करणार कन्या जन्माचे स्वागत उरण तालुक्यातील धुतुम ग्रामपंचायत तर्फे करण्यात येणार आहे.असा निर्णय घेणारी रायगड जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत आहे.

कोरोना नंतर धुतुम ग्रामपंचायतची महिला ग्रामसभा झाली असून सोबत हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. सरपंच रेश्मा शरद ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिकसभा व ग्रामसभेत ठराव संमत करण्यात आला असून दिनांक 8 मार्च 2022 पासून महिला दिनाचे औचित्य साधून धुतूम गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक कन्या जन्माचे स्वागत योजना म्हणून रुपये पंचवीस हजार (25000) ची 21 वर्ष साठीची एफडी नव कन्येच्या नावे करण्यात येईल असा सर्वानुमते धाडशी निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी 8 मार्च 2022 पासून लागू होईल याची माहीत हळदीकुंकू समारंभात देण्यात आली.त्या वेळी महिलांनी या योजनेचे आणि सरपंच व सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. या सभेला सरपंच रेश्मा ठाकूर, माजी सरपंच सीताबाई ठाकूर, माजी उपसरपंच वैशाली पाटील, माजी उपसरपंच आशा ठाकूर, माजी उपसरपंच सविता ठाकूर, सदस्या पूजा ठाकूर, सदस्या निर्मला ठाकूर, करुणा घरत माजी उपसरपंच, रेश्मा रणधीर ठाकूर बचत गट अध्यक्ष , पूजा शक्ति ठाकूर, साधना प्रकाश ठाकूर, वंदना सदानंद ठाकूर, अलका रामचंद्र ठाकूर, शमिता दता ठाकूर, शोभा लक्ष्मण ठाकूर, प्राथमिक शाळा धुतूम महिला शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत महिला कर्मचारी, विविध महिला बचत गटाच्या प्रतिनिधी आणि भगिनींनी समारंभात सहभाग घेतला. या प्रसंगी ग्रामसेवक विनोद मोरे यांनी विविध योजनांची माहिती दिली तर उपसरपंच शरद ठाकूर यांनी अद्ययावत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची माहीती, येणाऱ्या अडचणी व त्यावर मात करण्यासाठी आवश्यक सहकार्याची भूमिका महिला कडून अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. तर लवकरच प्रत्येक कुटंबाला IOTL तर्फे ओला आणि सुका कचरा साठी कचराकुंड्या देण्यात येतील अशी आनंदाची बातमी देण्यात आली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *