ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे होळी महिला स्नेह संमेलन २०२२ संपन्न

March 21, 202216:55 PM 36 0 0

उरण (संगिता पवार ) : परमार्थ सेवा संस्था उरण च्या वतीने शुक्रवार ( दि. १८ )रोजी शिवम अपार्टमेंट ,सायंकाळी ४ ते ७ या वेळेत परमार्थ सेवा संस्था उरण च्या अध्यक्षा अॅड .डिम्पल गुर्जर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला .सुमारे २०० हूनअधिक महिलांनी सहभाग घेतला होता . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बी .के .भारती दीदी यांनी भूषविले होते .नारी नरक द्वार नही स्वर्ग का द्वार है या संदेश सोबत विषयावर बी .के .भारती दीदी मोलाचे मार्गदर्शन केले . महिला सक्षमीकरण या विषयावर परमार्थ सेवा संस्था उरण च्या अध्यक्षा अॅडव्होकेट .डिम्पल लक्ष्मण गुर्जर यांनी महिलांना मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमात महिलांसाठी मनोरंजन खेळ ,भजन ,नृत्य ,गीत आदींचा समावेश होता ,खेळांच्या स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या महिलांना प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मान चिन्ह ,सन्मान वस्र देऊन गौरविण्यात आले .प्रत्येकखेळात तीन बक्षिसे देण्यांत आली .
या वेळी बी .के .भारती दीदी ,परमार्थ सेवा संस्था उरण च्या अध्यक्षा अॅडव्होकेट .डिम्पल लक्ष्मण गुर्जर ,कैलास जैन ,हिर्देश गौर ,महिलावर्ग ,प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्वरीय विश्व विद्यालय उरण सेंटर च्या सर्व बहेन आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *