ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रेखा निकाळजे यांना होळकर समता पुरस्कार

December 28, 202021:36 PM 62 0 0

जालना ( प्रतिनिधी) : उपेक्षित, वंचित घटक ,अन्यायग्रस्त महिला यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखा बाबासाहेब निकाळजे यांना नागपूर येथील मदत सामाजिक संस्थेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर समता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

रेखा निकाळजे यांनी शहर व ग्रामीण भागात महिला बचत गट स्थापन करून विविध प्रकारे अन्यायग्रस्त असलेल्या महिलांना न्याय मिळवून दिला आहे .तसेच असंघटित आणि शासनदरबारी बेदखल असलेल्या कामगारांची नोंदणी करून दोन हजार पेक्षा अधिक कामगारांना शासकीय मदत मिळवून दिली . त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नागपूर येथील मदत संस्थेच्या अठराव्या राज्य स्तरीय सामाजिक कार्यकर्ता संमेलनात राजमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर समता पुरस्कार वितरित केला जाणार होता तथापि कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता रेखा निकाळजे यांना सदर पुरस्कार पाठविण्यात आला . शाल, गौरव चिन्ह,व प्रमाण पञ असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्कार मिळाल्याबद्दल सुमित्रा जोशी, अलका झाल्टे, कल्पना मिसाळ,महेश तौर , अशोक काळे ,योगेश मोहिते आदींनी रेखा निकाळजे यांचे अभिनंदन केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *