ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मा. आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण तर्फे केलेले विविध सामाजिक उपक्रम

July 18, 202214:44 PM 26 0 0

उरण (तृप्ती भोईर) : मा. आमदार महेश बालदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण तर्फे एक सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने दिनांक १७/०७/२०२२ रविवार रोजी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. प्रथम सकाळी १० वाजता वृक्षारोपण करण्यात आले.व त्यानंतर ११ वाजता तीन गटांत विभागणी करून चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत एकूण ९७ विद्यार्थ्यांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेतला होता. चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक रवीशेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास सौ. गौरी देशपांडे (भाजपा चित्रपट युनियन सचिव महाराष्ट्र प्रदेश ), सौ गौरी मंत्री (सदस्या ,भाजपा सांस्कृतिक सेल उरण), सौ. श्लोक पाटील (पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्कुल उरण), सौ. तृप्ती भोईर (पत्रकार उरण) यांची उपस्थिती होती. मा. आमदार महेशजी बालदी यांना भा ज पा चित्रपट युनियन तर्फे सौ. गौरी देशपांडे यांनी व इथे जमलेल्या पाहुण्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दुपारी २ वाजता चारफाटा, उरण येथे झोपडपट्टी येथील गरजू मुलांना अन्नदान करण्यात आले .
सायंकाळी ४ वाजता ओ. एन .जी.सी.ठाकुर नगर झोपडपट्टी येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले .

या वेळी “मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान” चे अध्यक्ष विशाल विजय पाटेकर यांनी सर्वांचे आभार मानत असेच सामाजिक कार्य मा. आमदार महेश शेठ यांच्या मार्फत करत राहू .असे आश्वासन दिले . या कार्यक्रमाला उपस्थित “मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे” सभासद विकास पाटेकर , शौनक समेळ , भावेश रावल , भद्रेश रावल , बादल म्हात्रे , गिरीश पाटेकर, पुनम पाटेकर, सायली पाटेकर , यांनी अमूल्य मेहनत घेऊन उत्तमरित्या नियोजित उपक्रमांतुन सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे कार्य केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *