ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती च्या राज्य अध्यक्ष पदी मा.सराेजताई पाटील यांची निवड

January 25, 202213:17 PM 47 0 0

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती च्या राज्य अध्यक्ष पदी मा.सराेजताई पाटील यांची राज्यकार्यकारणीच्या बैठकीत निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे जेष्ठ विचारवंत व कामगार चळवळी चे जेष्ठ नेते व महा.अंनिस चे राज्य अध्यक्ष दिवंगत प्रा. डाँ.एन.डी.पाटील सर यांच्या त्या पत्नी आहेत.

महा.अंनिस च्या आज पर्यंत च्या कारकिर्दींमध्ये मा.सराेजताई पाटील यांचा माेलाचा वाटा आहे. राज्य भरातील कार्यकर्त्यांच्या एकमताने व मा.सराेजताई पाटील यांनी स्विकृति दिल्या मुळे आज राज्यकार्यकारणी मध्ये निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी मुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन चळवळी ला भक्कम वैचारीक बळ मिळाले आहे. या मुळे जालना जिल्ह्यातील महा.अंनिस च्या जिल्हा अध्यक्षा मा.विमलताई आगलावे, प्रधान सचिव तथा राज्य सदस्य मधुकर गायकवाड , जिल्हाकार्याध्यक्ष तथा राज्य सदस्य ज्ञानेश्वर गिराम, रमाकांत बरिदे, शंकर बाेर्डे,कल्याण बागल, प्रा.बसवराज काेरे, प्रशांत वाघ,मनाेहर सराेदे, अच्युत माेरे, संजय हेरकर, नारायण माहाेरे, संताेष माेरे, निकीता अंबट,साेनाली शेख, अनुराधा हेरकर, माया गायकवाड ,अनिता माहाेरे, सुभाष कांबळे , राजेभाऊ मगर यांनी अभिनंदन करुन आनंद व्यक्त केला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *