उरण ( संगीता ढेरे ) असं म्हणतात की तुमच्या कडे धन – दौलत पैशांची श्रीमंती खूप असेल हो …पण…मनाचे मोठेपण आणि हृदयात दुसर्याबद्दल असणारी आपुलकी हीच खरी श्रीमंती,….असते!…संपत्ती किती हि असो पण दान करण्याची कुवंत लागते. अश्याच ज्यांनी आपल्या सत्कार्यातून दान पारमितेचा नवा अध्याय निर्माण केला आहे .
ज्यांच्या कार्याची महती आणि व्याप्ती लिहायला शब्द कमी पडतील ,लेखणी अपुरी पडेल अशी दोन… व्यक्तीमत्व… म्हणजेच …साई देवस्थान साईनगरचे संस्थापक अध्यक्ष …सन्माननीय …श्री रविशेठ दादा पाटील साहेब…आणि …. केअर ऑफ़ नेचर सा.संस्थेचे संस्थापक …सन्माननीय …श्री राजू मुंबईकर साहेब…..या गुरू – शिष्यांच्या जोळगोडीला … स्वतंत्र भारताच्या ७५ व्या अमृतमोहत्सवी स्वातंत्रदिनाच्या पावन पवित्र दिवशी … हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी कलाकार …हास्यसम्राट..सन्माननीय ..श्री जॉनी लिव्हर यांच्या शुभहस्ते …कोविड १९ योद्धा या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ह्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजक … मिमिक्री आर्टिस्ट असोशिएशन मुंबई,मराठी व्यावसायिक वाद्यवृंद संघ,लावणी कलावंत संघ,संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था…आणि … संतोष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते … या पुरस्कार वितरण सोहळ्यात …खास पुरस्कारानं सन्मानीत होणारं पाहिलं नावं होतं ते … अर्थात …माणसातील माणुसकी जपणारां माणसातला देवमाणूस.. म्हणजेच सन्माननीय … रविशेठ दादा पाटील साहेब…..ज्यांनी ह्या कोरोना महामारीच्या काळात आपल्या दातृत्वगुणांच्या संस्कारातून गरीब – गरजूवंत बांधकाम मजूर बांधवांकरीता दररोज दोन हजार अन्नाची पाकिटं वाटप करत त्या बांधवांच्यां दोन वेळच्या शिदोरीचा प्रश्न सोडविला ,तर कित्येक बांधकाम मजुरांना आपल्या वाहनातून त्यांच्या गावांपर्यँत पोहविण्याचं पुण्यांचं काम केलं अनेक कलाकार मंडळींना सावरण्याचं पवित्र कार्य केलं ….तर .पुरस्कारानं सन्मानीत होणारं दुसरं नावं …अर्थात …..समाज कार्यातील दुसरा कोहिनूर …म्हणजेच …केअर ऑफ़ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक …सन्माननीय… श्री राजू मुंबईकर साहेब….ज्यांनी ह्या कोरोना महामारीच्या भयानक अश्या संकट काळात …दूर – दुर्गम ,डोंगर – दाऱ्यांत राहणाऱ्या आदिवासी बांधवांकरीता कित्येक वेळा अन्न – धान्य वाटप, लहान चिमुकल्यानां सायकल वाटप,खेळणी वाटप, संपूर्ण आदिवासी वाड्यांवर सॅनिटायजर फवारणी, मास्क वाटप,१७० मीटरचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवून त्या आदिवासी बांधवांकरीता साक्षात देवदूत ठरले.
म्हणूनच मनात कुठल्याही प्रकारचा गर्व न धरणारी व्यक्ती जेव्हा दुःखितांच्या व्यथा – वेदना समजून घेऊन त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो तोच खरा जनमान्य समाजसेवक असतो …आणि हि दोन्ही व्यक्तीमत्व खऱ्या अर्थाने ह्या पुरस्काराचे हक्कदार आहेत ..कारण ह्या कोरोना महामारीच्या भयानक आणि जीवघेण्या काळात सुद्धा जिथे सर्वजणानीं स्वतःच्या सुरक्षितते साठी घरातच राहणं उचित समजलं त्या वेळेस सुद्धा ह्या महानुभवांनीं आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या जीवावर उदार होतं ह्या भयानक परिस्थितीत सुद्धा आपल्या मनाच्या मोठे पणाची आणि दातृत्वाच्या गुणांची कवाडं उघडी करत गरजूवंताच्यां मदती करीता पुढे सरसावून प्रत्यक्ष जनमाणसांत जाऊन आपलं उत्तरदायित्व जपलं. म्हणूनच आपण गरीब – गरजूवंतासाठी व आदिवासी बांधवांसाठी केलेलं काम हे खरोखरच मानवतावादी आणि आदर्शवत आहे… आणि …म्हणूनच …आपण दाखविलेल्या माणुसकी बद्दलच्या अविरत कार्याची दखल घेत …. हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी कलाकार …हास्यसम्राट .सन्माननीय … श्री जॉनी लिव्हर यांच्या शुभहस्ते …कोविड १९ योद्धा या पुरस्कारानं सन्मानीत करून सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन योग्य कार्याचा योग्य तो सन्मान करून गौरविण्यात आले
Leave a Reply