ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर राष्ट्रीय पुरस्कार 2021 ने सन्मानित

April 19, 202216:50 PM 22 0 0

उरण (संगिता पवार) : रायगड जिल्ह्यात केलेल्या समाज कार्याबद्दल शिवसेनेचे जिल्हापरिषद सदस्य विजय भोईर आणि ब्लू स्टार सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्विसेस चे प्रोप्रायटर विकास भोईर ह्या जुळ्या भावांना राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर राष्ट्रीय पुरस्कार 2021 ने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या हस्ते राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित राज्य भवनावर सन्मानित करण्यात आले त्या पुरस्कारा बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
शिवसेनेचे जिल्हापरिषद सदस्य विजय भोईर आणि त्यांचे बंधू जुळे बंधू विकास भोईर यांनी सामाजिक कार्याचा वसा हाती घेतला आहे हे कार्य फक्त उरण मध्येच नव्हे तर संपूर्ण रायगड भर पसरले आहे त्यांनी अनेक गरजु आणि गरीब विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे.चिरनेर येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना कराटे च्या गणवेश सह मोफत शिक्षण दिले जात आहे.
कोरोनामध्ये गरजूंना अन्नधान्य वाटप तसेच अनेक भागात वाफारा मशीन वाटप केल्या आहेत .मोफत आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर अशा प्रकारच्या शिबिरा मधून रुग्णांचे मोफत उपचार करण्यात आले आहे.कोरोनामध्ये पोलीस खात्याला पेट्रोलीग साठी स्वतःच्या गाड्या ही देण्यात आल्या होत्या अशा विविध सामाजिक कार्याची जाण लक्षात घेत त्यांना या सामाजिक कार्याबद्दल राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर राष्ट्रीय पुरस्कार 2021 ने राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *