नांदेड – तब्बल ३५ दिवस कोरोनाशी झुंज देऊन कोरोनावर मात केलेल्या आणि कोरोना योद्धा ठरलेल्या सप्तरंगी साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर यांनी उपचारांती शासकीय दवाखान्यातील सर्व डॉक्टर, नर्स, ब्रदर, सफाई कामगार ते चौकीदारापर्यंत सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
येथील सप्तरंगी साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा कृष्णामाई विद्यामंदिर बळेगाव ता. उमरी येथील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजित गोणारकर हे 23 मार्च रोजी कोरोना बाधित झाले होते. त्यांना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी प्रकृती हलाखीची बनली होती. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी शर्थीचे प्रयत्न केले . त्यामध्ये डॉ निळकंठ भोसीकर शल्यचिकित्सक, डॉ. केळकर, डॉ. अनिल देगावाकर , डॉ. चव्हाण ,डॉ. कापसे, डॉ. भूरके, डॉ. देशमुख, डॉ. आकाश इंगोले, डॉ. ओंकार कोल्हे, डॉ. सुजित ढगाळे, डॉ. जिशा, डॉ. मनीषा वंजारे यांनी आपले कौशल्य पणाला लावले व माझा प्राण वाचवून माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी एक अविस्मरणीय देणं मला दिले अशा भावना व्यक्त केल्या.तर संदीप कोल्हे दीपक खांजोडे ब्रदर तर आम्रपाली सिरसे, मंगल गायकवाड, राखी चौदंते व लूट सिस्टर यांनी तर सुरवातीपासून शेवटपर्यंत सेवासुश्रूषा करण्याचे मोलाचे कार्य केले.
या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने गोणारकर यांची तब्बेत एकदम सुधारली तब्बल 35 दिवसानी रुग्ण सहीसलामत घरी येत असताना .या मान्यवरांनी केलेल्या प्रयत्नांना कुठेतरी शाब्बासकीची थाप पाठीवर पडली पाहिजे या हेतुने व आणखी असेच त्यांना बळ मिळावे म्हणून आदरातिथ्य डॉक्टरांपासून चौकीदारापर्यंत कोरोना योद्ध्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांसाठी आभार व्यक्त करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन एकनाथ कार्लेकर व अमोल गोणारकर यांनी केले होते. यावेळी विनायक वाघमारे, संदीप गोणारकर, विकास काळे, शुक्लोधन गायकवाड, सय्यद शादुल, आशीष ढगे, कुणाल भुजबळ यांच्यासह अनेक नातेवाईक मित्रमंडळी उपस्थित होते.
Leave a Reply