सातारा, माण तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ छाया अशोक फरकुटे यांचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सत्कार घेण्यात आला. आपल्या शैक्षणिक सेवेच्या 34 वर्षात सौ फरकुटे यांनी शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.
अत्यंत साधे राहणीमान आणि आपल्या कामाबद्दल कमालीची निष्ठा हा त्यांचा गुणविशेष असून विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा
हातखंडा आहे. त्यांनी आतापर्यंत मलवडी, खताळवस्ती,सिद्धेश्वर कुरवली याठिकाणी सेवा केली असून त्या सध्या पिंपरी ता.माण येथे कार्यरत आहेत. नुकतीच शाळा व्यवस्थापन समिती ची मासिक सभा संपन्न झाली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोनाजी राजगे,डॉ.दिलीप राजगे,आबासाहेब राजगे ,भारत सातपुते,हणमंत अवघडेआणि इतर सदस्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते . प्रास्ताविक सुरजकुमार निकाळजे यांनी केले. सूत्रसंचालन मुख्याध्यापक दाजी गोरड यांनी केले अविनाश शिंदे यांनी आभार मानले.
Leave a Reply