मुरूड जंजिरा (प्रतिनिधी सौ नैनिता कर्णिक)०९ आॅकटोबर जागतिक टपाल दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजिरा येथे टपाल कार्यालयात जाऊन सेवानिवृत्त तहसिलदार नयन कर्णिक व सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ नैनिता कर्णिक, पत्रकार मेघराज जाधव सर यांनी कार्यालयातील उप डाक कार्यालय प्रमुख पंकज दांडेकर, सहायक प्रमुख फैयाज पंचुलकर पोस्टमन समीर घरत, विजय शहापूर कर, नंदकुमार अत्रे या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
तसेच नयन कर्णिक यांनी त्यांच्या मिळणाऱ्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. या वेळी पंकज दांडेकर यांनी डाक कार्यालयातील उपलब्ध असलेल्या योजनांचा फायदा कसा होतो हे सविस्तर सांगितले. व आपल्या केलेल्या सन्मानाबाबत आभार मानून कार्यक्रमांची सांगता केली.
Leave a Reply