जालना ( प्रतिनिधी) : कोरोना महामारी मुळे सर्व क्षेत्रांना मोठे हादरे बसले आहेत. बँकिंग क्षेत्रातील अर्थकारणावर मोठा परिणाम झाला असून आर्थिक मंदीचे सावट असतानाही सर्वसामान्य ठेवीदार, छोटे व्यवसायिक व कुटीर उद्योजकांना सहकारी तत्त्वावर कार्यरत असलेल्या बँका आणि पतसंस्था आशादायी ठरल्या आहेत. असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपाचे शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी आज येथे बोलताना केले.
स्वा. सै.रामभाऊजी राऊत नागरी सहकारी पतसंस्थेची विसावी (२०) वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ( ता. 30)पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाली .शासकीय नियमांचे पालन करून मोजक्याच संचालकांची या सभेस उपस्थिती होती. तर उर्वरित संचालक व सभासदांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदवला.
राजेश राऊत पुढे म्हणाले की, वीस वर्षांपूर्वी सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन स्थापन केलेल्या संस्थेस संचालक, सभासद व ठेवीदारांनी सहकार्य केले .पारदर्शी कारभार ,उत्तम सेवा व सचोटी या त्रिसूत्रीवर संस्था ग्राहकांना तत्पर सेवा देत असल्याने ठेवीदारांचा विश्वास अधिक दृढ झाला असल्याचे सांगून राजेश राऊत यांनी कोरोना पासून बचावासाठी सभासदांनी आपली व कुटुंबीयांची काळजी घ्यावी. असे आवाहन त्यांनी केले.
संचालक प्रा. राजेंद्र भोसले यांनी राष्ट्रसंत ,जगद्गुरु, तुकाराम महाराज बीज निमित्त अनु रेणू या थोकडा ,,तुका आकाशा एवढा,,,।या अभंगाचे विवेचन करताना जगद्गुरु तुकोबांचा जीवनपट, त्यांचे औदार्य, गाथा रचून समाजाला दिलेली नवी दिशा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अमेरिकन विद्यापीठात आज तुकोबांचे अभंग अभ्यासले जातात. असेही प्रा. राजेंद्र भोसले यांनी नमूद केले.
संस्थेचे सचिव संजय बोबडे यांनी अहवाल वाचन केले. सूत्रसंचालन शांतीलाल राऊत यांनी केले तर संस्थेचे उपाध्यक्ष शामसुंदर लोया यांनी आभार मानले .यावेळी संचालक सर्व श्री गणेश भोसले ,जालिंदर डोईफोडे, विजयकुमार पंडित, सागर देवकर, संजय देठे, रुपेश जैस्वाल ,विशाल नंदाल , मनोज जाधव यांची उपस्थिती होती.
Leave a Reply