ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कसा आणि कुठे होत होता अवैध गर्भपात; बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; सविस्तर माहितीसाठी पहा विडिओ

April 30, 202212:14 PM 53 0 0

जालना शहरात सुरु असेलल्या गर्भपाताचा पर्दाफास जिल्हा शल्य चिकित्सक आणि त्यांच्या टीमने दिनांक 25- रोजी केला. राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, पुणे येथुन मिळालेल्या माहितीवरुन जिल्हा स्तरावरील टिमने हा गोरखधंदा उघडकीस आणून कारवाई केली.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना व्हि. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रेडीओलॉजीस्ट डॉ. विजय वाकोडे, व वैद्यकिय अधिक्षक, डॉ. सरोज घोलप, विधी सल्लागार अ‍ॅड. सोनाली काबंळे यांनी स्टिंग ऑपरेशनची मोहीम आखून ही कारवाई केली. सदरील बनावट गरोदर महिलेस तयार करुन संबंधीत डॉ. सतीष गवारे यांच्या ढवळेश्वर येथील राजुरेश्वर क्लिनीक येथे बेकायदेशीर लिंगनिदान व अवैध गर्भपात करणारे नोंदणीकृत नसलेल्या, चायनिज अल्ट्रासाउंड मशीन असलेल्या ठिकाणी सोनोग्राफी करीता वेळ घेण्यात आली. परंतु, वेळेवर संबंधीत डॉक्टरने प्रतिसाद न दिल्यामुळे जिल्हा स्तरावरील टिमने राजुरेश्वर क्लिनीक येथे छापा मारला.
डॉ. अर्चना व्हि. भोसले जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ. विजय वाकोडे, डॉ. सरोज घोलप, अ‍ॅड सोनाली काबंळे, मनोज जाधव, संदीप रगडे, चंदनझिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर. के. नाचण, पो.उप.नि. झलवार, महिला पोलीस उप निरिक्षक सखु राठोड, नाईक पोलीस कॉस्टेंबल अशोक जाधव, कैलास बारवाल, चंद्रकांत माळी, श्रध्दा गायकवाड यांनी ढवळेश्वर येथील राजुरेश्वर क्लिनीकमध्ये छापा मारला.

यावेळी तेथे गरोदर महिला यांना गर्भपाताच्या गोळया देवुन तीला गर्भपात करण्यासाठी भरती केले असल्याचे आढळूल आले. गरोदर महिला व तीची आई यांचे म्हणण्यानुसार डॉ. सतीष गवारे यांनी दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी राजुरेश्वर क्लिनीकमध्ये मशीनव्दारे सोनोग्राफी करुन त्यांना हा गर्भ मुलीचा असल्याचे सांगण्यात आले. तो गर्भपात करायचा असल्यास गर्भपाताची सुविधा आमच्या राजुरेश्वर क्लिनीकमध्ये उपलब्ध आहे. असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे दिनांक 29 एप्रिल 2022 रोजी सकाळी 09.00 वाजता गर्भपात करण्यासाठी भरती करण्यात आले. तसेच गर्भपात करण्यासाठी आलेल्या रुग्णास जोराच्या कळा चालु झाल्यामुळे असल्याचे जिल्हा पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे पथकाने तात्काळ जिल्हा स्त्री रुग्णालय, जालना येथे 108 च्या रुग्णवाहीकेतून उपचारासाठी तात्काळ हलविले. तेथे गेले नतंर अवघ्या 10 मिनीटांत गर्भपात झाला. यावेळी स्त्री जातीचे भ्रूण आढळुन आले. तसेच माता सुखरुप असुन जालना जिल्हयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक व त्यांचे टिम यांचे सतर्कतेमुळे सदर महिलेचे प्राण वाचले आहे.


सुरवातीपासुन डॉ. सतीष गवारे हे सोनोग्राफी मशीनसहीत फरार झाले आहेत. तेथे उपस्थिती असलेले राजु भानुदास पवार, डॉक्टरांचा मदतनीस व दोन महिला मदतनीस त्यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर सोनोग्राफीसाठी वेळ देवुन गर्भ लिंग निदान करतात व स्त्रि जातीचे गर्भ असल्यास गर्भपात देखील करुन देतात. सदरील डॉक्टर गर्भलिंग करण्यासाठी 15 हजार ते 20 हजार रुपये घेतात व गर्भपात करण्यासाठी 18 ते 20 हजार रुपये घेतात. राजुरेश्वर क्लिनीक व तेथे उपस्थित डॉक्टर यांचे मदतनीस व महिला मदतनीस यांची झडती घेतली असता त्यांनी लपवुन ठेवलेल्या गर्भपाताच्या 3 MTP किट व 1 वापरण्यात आलेली MTP किट आढळुन आली. तसेच जप्त केलेले वस्तुमध्ये बर्‍याच डॉक्टरांचे रेफर बुक, रजीस्टर, MTP किट, नगदी रुपये, रुग्णाला लावण्यात आलेली सलाईन हे सर्व साहित्य जप्त करुन व सिल बंद करुन पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरकडुन व गर्भपाताची नोंदणी नसलेल्या क्लिनीकमध्ये गर्भपात करतांना आढळुन आल्याने वैद्यकिय गर्भपात कायदयानुसार कलम 312, 313, 315, 120 (ब), 201, 34 भारतीय दंड विधान सह कलम 3 व 4, वैद्यकिय गर्भपात कायदा 1971 सह कलम 33 महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टीशनर अ‍ॅक्ट, सह कलम 3 व 6 गर्भधारणा पुर्व व प्रसवपुर्व निदान तंत्रलिंग निवडीस प्रतिबंध कायदा 1994 प्रमाणे ईसम नामे संदीप राजु भानुदास पवार व महिला नामे सुनिता सुभाष ससाणे व कौशल्या नारायण मगरे, तसेच पळून गेलेले डॉ. सतीष बाळासाहेब गवारे, एजंट संदीप गोरे, डॉ. पुजा विनोद गवारे, गर्भपातासाठी पेशंट घेवून येणारे डॉ. प्रिती मोरे रा. रामनगर (साखर कारखाना) व गर्भपात करण्यासाठी लागणारे औषधी पुरविणार्‍या मेडीकल मालक स्वाती गणेश पाटेकर यांचेविरुध्द कायदेशीर फिर्याद देवुन पोलीस ठाणे चंदनझिरा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाहीमध्ये जिल्हाधिकारी, जालना व पोलीस विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले. असल्याचे डॉ. जिल्हा शल्य चिकीत्सक अर्चना भोसले यांनी माध्यमांशी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *