ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रशासन  आणखी किती बळी ची वाट पाहतेय ? : ओमप्रकाश चितळकर

October 21, 202115:08 PM 56 0 0

जालना ( प्रतिनिधी) :  जालना शहराच्या वळण रस्त्यालगत रोहनवाडी मार्गावरील कुंडलिका नदीवर  उंच पूल, गतीरोधक,वाहतूक सिग्नल नसल्याने मृत्यू चा सापळा बनत चाललेल्या रस्त्याच्या दुरूस्ती बाबत प्रशासन आणखी किती बळी जाण्याची वाट पाहतेय ? असा सवाल रासप नेते ओमप्रकाश चितळकर यांनी केला आहे. मंठा चौफुली ते अंबड चौफुली दरम्यान कुंडलीका नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत छबूराव गुढेकर हे  मृत पावल्याची घटना   दोन दिवसांपूर्वी घडली होती.रासप नेते ओमप्रकाश चितळकर यांनी राणीउंचेगाव येथे गुढेकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच  शासकीय मदत मिळण्यासाठी रासप चे संस्थापक, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या  सहकार्याने  शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा विश्वास दिला.

ओमप्रकाश चितळकर या वेळी म्हणाले, औरंगाबाद चौफुली ते मंठा चौफुली दरम्यान वळण रस्ता टकाटक झाल्याने भरधाव वेगात वाहने धावत आहेत.शिवाय रस्त्यावर गतीरोधक नसल्याने अपघाताच्या मालिका सुरू आहेत. असे नमूद करत ओमप्रकाश चितळकर म्हणाले, रोहनवाडी मार्गावरील कुंडलिका नदीवर रखडलेल्या पुलाची रुंदी व उंची वाढवून वळण रस्त्यास जोडावा या साठी रासपने वारंवार निवेदने, आंदोलने केली. मात्र प्रशासन काहीच करत नसल्याने   नागरिकांना नाहक जीव गमवावा लागत असल्याचे चितळकर यांनी सांगितले.पुल नसल्याने रोहनवाडी रस्त्याने वर चढतांना दुचाकी स्वारांना जीव मुठीत धरावा लागतो तर पुलाजवळ वाहतूक सिग्नल, गतीरोधक नसल्याने वळण रस्त्याने भरधाव वेगात येणाऱ्या वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून या पुढील दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित उंच पुलाची उभारणी करून गतीरोधक व वाहतूक सिग्नल बसवावेत. अशा मागण्या ओमप्रकाश चितळकर यांनी केल्या. या वेळी  शहादेव इंगळे ,अमोल शेळके ,अॅड .संभाजी चुनखडे, परमेश्वर शेळके,कृष्णा शेळके यांच्या सह रासप चे पदाधिकारी, कार्यकर्ते, गुढेकर कुटुंबियांचे नातेवाईकांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *