ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरणमध्ये एमआयडीसीची तीन इंच व्यासाची जलवाहिनी वारंवार फुटतय कशी ?

October 7, 202115:38 PM 37 0 0

उरण (संगिता पवार ) उरण परिसराला पाणी पुरवठा करणारी एमआयडीसीची तीन इंच व्यासाची जलवाहिनी मंगळवारी ( दि५) सकाळी पुन्हा एकदा अचानक फुटण्याची घटना घडली आहे.जेएनपीटी टाऊनशिप – नवघर दरम्यान फुटलेल्या उच्च दाबाच्या जलवाहिनीमुळे सुमारे २५ फुट उंचीपर्यंत पाण्याचे कारंजे उडून लाखो लिटर्स पाणी वाया गेले.परंतु नवघर ते बोकडविरा या एक कि.मी अंतरावर एम आय डीसीची जलवाहिनी वारंवार फुटतय कशी हा चर्चेचा विषय ठरला आहे.


उरण तालुक्यातील औद्योगिक,शहर व ग्रामीण परिसरातील दिड लाख नागरिकांना एमआयडीसीच्या माध्यमातून रानसई धरणातुन पाणी पुरवठा केला जातो.मंगळवारी (दि५आँक्टोबर ) जेएनपीटी टाऊनशिप – नवघर दरम्यान एमआयडीसीची तीन फूट व्यासाची पाण्याची मुख्य जलवाहिनी अचानक फुटली.या फुटलेल्या जलवाहिन्या मधुन २५ फुटांपर्यंत पाणी उडाले होते.तासभर पाणी मोठ्या प्रमाणावर उडाल्याने जेएनपीटी टाऊनशिप – नवघर दरम्यानच्या रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.
एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ व्हॉल्व बंद करून प्रथम वाया जाणारे पाणी थांबवले.दिड तासातच जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करुन पाणी पुरवठा सुरळीत सुरू केला. उच्च दाबामुळे वेल्डिंग जॉइंडला तडा गेल्याने जलवाहिनी फुटली असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता रणजित काळबागे यांनी दिली आहे.परंतु उरण शहर तसेच परिसरातील रहिवाशांना,प्रकल्पांना सुरळीत करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठ्याच्या एम आय डीसीच्या नवा जलवाहिनीचे काम मागील वर्षी ठेकेदारांच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून करण्यात आले.मात्र असे असतानाही वारंवार नवघर ते बोकडविरा या दरम्यानची जलवाहिनी फुटत असेल तर या मागे गोड बंगाल काय असी चर्चा सध्या उरणात रंगू लागली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *