ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आपत्काळात ‘श्रावणी सोमवार’चे व्रत कसे अंगीकारावे ?

August 9, 202116:20 PM 65 0 0

यावर्षी ‘श्रावणी सोमवार’ हे व्रत 9, 16, 23, 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर या दिवशी केले जाईल. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालण्याचा प्रघात आहे. यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्रावणी सोमवारचे व्रत नेहमीप्रमाणे करण्यास काही ठिकाणी मर्यादा असू शकतात. सनातन संस्थेद्वारा संकलित या लेखात आपत्काळातील (कोरोनाच्या संकटकाळातील) निर्बंधांमध्ये जेथे घराबाहेर पडून शिवालयात जाणे शक्य नाही, त्यांनी ‘आपद्धर्मा’चा भाग म्हणून घरी राहूनच हे व्रत कशाप्रकारे अंगीकारावे, याविषयी लेखात धर्मशास्त्राधारित विवेचन करण्यात आले आहे.

1. श्रावण सोमवारी उपवास करून शिवाची विधीवत् पूजा करणे
‘उपोषितः शुचिर्भूत्वा सोमवारे जितेन्द्रियः।
वैदिकैर्लौकिकैर्मन्त्रैर्विधिवत्पूजयेच्छिवम् ।।’
– ग्रंथ व्रत राज

अर्थ : संयम आणि शुचिर्भूतपणा आदी नियमांचे पालन करत सोमवारी उपवास करून वैदिक अथवा लौकिक मंत्राने शिवाची विधीवत् पूजा करावी.

शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.

2. शिवाची पूजा कशी करावी ?
अ. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी.

आ. शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी.

इ. शिवाच्या चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी.

ई. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर शिवाचा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो.’

3. शिवामूठ व्रत

विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणार्‍या चार सोमवारी 4 प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या.

संकलन- श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था

संपर्क- 9284027180

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *