ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वटवृक्ष सामाजिक संस्थेच्यावतीने दसऱ्यानिमित्त आपट्याचे रोपन

October 17, 202117:02 PM 26 0 0

उरण ( संगिता पवार ) उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने दसरा सणाचे औचित्य साधून आपट्याचे रोपन करण्यात आले. दसरा म्हणजेच विजयादशमी. या दिवशी महाराष्ट्रात सोनं म्हणून आपट्याच्या पानांची देवाण-घेवाण केली जाते. दसऱ्याला सोन्यासारखा मान असणारे, लुटता येणारे सोनं म्हणजे आपट्याची पाने. आज वाढत्या शहरीकरणामुळे आणि नव्याने होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामामुळे उलवे परिसरातील हजारोंच्या संख्येने वृक्षतोड झाली. त्यामुळे आपटा ही वनस्पती उलवे परिसरातून दिवसेंदिवस दुर्मिळ होत असल्याने आपट्याचे रक्षण व संवर्धन करण्याच्याने वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने दसऱ्यानिमित्त आपट्याचे रोप लागवडीचे उपक्रम हाती घेत उलवे सेक्टर २४ श्री. हनुमान मंदिर तलाव परिसरालगत रोपन करुन दसरा साजरा केला.


सोनेरी पानांचा वनराज आपटा हा खडकाळ माळरानावरही तग धरणारा आदर्श वृक्ष आहे. औषधी गुणधर्म असलेला ह्या बहूगुणी वृक्षावर अनेक पक्ष्यांचा अधिवास असतो. त्यामुळे आपटा पर्यावरण दृष्टीने महत्वाचा वृक्ष आहे. भारतीय सण आणि निसर्ग यांचे अटूत नाते कायम जपण्यासाठी प्रत्येक सणांना ज्या वृक्षाची आवश्यकता आहे त्या त्या रोपांची लागवड वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने होत असते आणि ती दरवर्षी केली जाईल असे मत संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी यांनी मांडले. सदर कार्यक्रमास उलवे पोलीस चौकीतील पोलिस नाईक गणेश भालेकर, हवालदार राजेश सुतार आणि वटवृक्ष सामाजिक संस्थेचे धनजंय तांबे, मनोहर चवरकर, गणेश मढवी, अनिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *