ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वेळीच उपचार घेतल्याने कर्करोग बरा होतो – आरोग्यमंत्री राजेश टोपे

October 18, 202113:54 PM 14 0 0

जालना (अनिता पवार) : दि. १७ – वेळीच उपचार घेतल्याने कर्करोग नक्कीच बरा होतो असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री मा. ना. राजेशभैय्या टोपे यांनी घनसावंगी येथील ग्रामीण रुग्णालयात संपन्न झालेल्या कर्करोग तपासणी, निदान व उपचार शिबिराच्या उदघाटन प्रसंगी केले. मंत्री हॉस्पिटल, रेड स्वस्तिक सोसायटी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, घनसावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने या उपचार शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय घनसावंगी येथे करण्यात आले होते. मा. ना. राजेश टोपे यांनी संपूर्ण घनसावंगी तालुक्यातील नागरिकांची कर्करोग तपासणी करणार असल्याचे सांगितले. तसेच लवकरच जालना जिल्ह्यात सर्व सुखसुविधानी सुसज्ज असे कर्करोग रुग्णालय उभारणार असल्याचे स्पष्ट केले. रेड स्वस्तिक सोसायटी व मंत्री हॉस्पिटल च्या सामाजिक कार्याचा गौरव आपल्या भाषणातून त्यांनी केला. तसेच कार्यकर्त्यांनी गावपातळीवर नागरिकांना आरोग्य विषयक माहिती द्यावी असे आवाहन केले. आज ज्याचे आरोग्य सुदृढ तोच खरा श्रीमंत असे ही स्पष्ट केले.


रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने मा . आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा “कोरोना योध्दा” म्हणून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आरती मंत्री यांनी केले. रेड स्वस्तिक सोसायटीचे सचिव संतोष लिंगायत यांनी रेड स्वस्तिक सोसायटी ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये शिबिरांच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती करून आरोग्य सुविधा देण्याचे सामाजिक काम करत असल्याचे सांगितले. डॉ. दीपक मंत्री यांनी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यविषयक योजनांमधून उपचार करत असताना काही आजार योजनेत बसत नसल्यामुळे अडचणी येतात त्यासाठी लक्ष घालण्याची विंनती केली तेव्हा राजेश टोपे यांनी असे उपचार ट्रस्ट च्या माध्यमातून करण्यासाठी लवकरच सूचित केले जाईल असे आश्वासन दिले. डॉ. आदित्य मंत्री यांनी कर्करोग विषयी उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन केले. डॉ. श्वेता सिकची – मंत्री, डॉ. श्रीपाद कौसडीकर, डॉ. राहुल तळेले यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले व उपस्थित रुग्णांची तपासणी केली. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती कल्याणराव सपाटे, घनसावंगी पंचायत समितीचे सभापती भागवतराव सपाटे, नंदुभाऊ देशमुख, डॉ. कैलास दरगड, संतोष लिंगायत, डॉ. दीपक मंत्री, सतिश संचेती, डॉ. भीमराव दोडके उपस्थित होते. कार्यक्रमास घनसावंगी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्करोगग्रस्त रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन जोशी यांनी तर आभार सतीश संचेती यांनी व्यक्त केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *