ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चौथ्या शहिद भगतसिंग वक्तृत्व स्पर्धेला उत्साही प्रतिसाद; उरणच्या सेंट मेरी कॉन्व्हेंट हायस्कुलची प्राची ठाकूर प्रथम क्रमांकाची विजेती

October 1, 202113:28 PM 12 0 0

उरण (संगिता पवार) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बेलापुर शाखा आयोजित विविध उपक्रमांच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम करते. याच हेतूने प्रामुख्याने किशोरवयीन मुला मुलींसाठी शहीद भगतसिंग वक्तृत्व स्पर्धा हा एक प्रमुख उपक्रम गेली तीन वर्षे आम्ही आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवत आहोत. 2018 साली सुरू केलेली ही स्पर्धा पहिली दोन वर्षे प्रत्यक्ष स्वरूपात घेतली गेली. परंतु, गेल्या वर्षी ‘कोविड – 19 महामारीमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे आम्ही ही स्पर्धा ऑनलाईन घेतली होती. 2021 हे स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. याही वर्षी ही स्पर्धा ऑनलाईनच घेण्यात आली तरी स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला.


नवी मुंबई, मुंबई व महाराष्ट्रातील इतर भागातील 25 शाळांतून 85 विद्यार्थी सहभागी झाले. 25 सप्टेंबर पासून 28 सप्टेंबर पर्यंत दररोज प्राथमिक फेरी झाली तर 29 सप्टेंबरला 20 स्पर्धकात अंतिम फेरी झाली. अंतिम फेरीत उरणच्या सेंट मेरी कॉन्व्हेंट शाळेची
खोपटे – धसाखोशी येथील रहिवासी असलेली प्राची संजय ठाकुर प्रथम क्रमांकाने विजयी झाली.  तिने ‘मी व माझे संविधान” या विषयावर भाषण केले. तर द्वितीय क्रमांक – कु. अनुजा मारुती जाधव, इ. 8 वी एम. जी. एम .विद्यालय नेरुळ,तृतीय क्रमांक- कु. समिक्षा संजय कटारनवरे, इ. 10 वी, आर. एस. टी. विद्यालय, गोवंडी मुंबई याशिवाय उत्तेजनार्थ बक्षिस कु. दुर्वा सुधीर देसाई, इ 10 वी, चेंबूर हायस्कुल मुंबई कु. श्वेता रविंद्र डोंबाळे, इ. 10 वी, कुमुद विद्यामंदिर, गोवंडी मुंबई कु. स्वराली आनंदराव सूर्यवंशी, इ. 9 वी, एम. जी. एम. हायस्कूल, नेरुळ नवीमुंबई यांनी पटकावला आहे.स्पर्धेतील विद्यार्थ्यांनींचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
स्पर्धेसाठी किरण जाधव – बदलापूर, रमेश साळुंखे- बेलापूर , संगिता नेहते – बेलापूर , बापू राऊत – डोंबिवली हे प्राथमिक फेरीसाठी तर मधुकर वारभुवन – वाशी, विजय खरात – बेलापूर, सुजाता मेहेत्रे – कोल्हापूर हे अंतिम फेरीचे परीक्षक होते. तर स्पर्धेचे सूत्रसंचालन रेखा देशपांडे व लेखा यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *