ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सन्मान नव्हे मानवीय वागणुक हवी – श्रीमती मंजुषा चितलांगे

March 11, 202215:44 PM 46 0 0

जागतीक महिला दिवस निमित्त जिल्हा ग्राहक आयोग जालना येथे महिला दिवस साजरा करण्यात आला. यावेळी महिला विधिज्ञानी ग्राहक आयोगातील महिला सदस्यांचा सत्कार केला. जालना जिल्हा ग्राहक आयोग येथील अध्यक्ष श्रीमती निलीमा संत तर सदस्य म्हणून श्रीमती मंजुषा चितलांगे व निता कांकरीया असून हे जालना जिल्ह्यासाठी गौरवाची गोष्ट आहे, असे महिला विधिज्ञाने प्रतिपादन केले.

ग्राहक तक्रार निवारण आयोग येथील सदस्य श्रीमती मंजुषा चितलांगे व निता कांकरीया यांनी प्रतिपादन केले की, फक्त एक दिवस महिला दिन म्हणून साजरा करावा व इतर दिवस तिला त्रास द्यावा हे उचीत नाही. महिलांना सन्मान नव्हे मानवीय वागणुक हवी. महिला समान संधी स्वतः आत्मसात करण्याचे त्यांच्यात घमक असल्याने त्यांना चांगली वागणूक द्यावी, इतकीच त्यांची अपेक्षा असते.
यावेळी महिला विधिज्ञ भाग्यश्री कुलकर्णी, शितल खांडेभराड, अॅड. अश्विन धन्नावत, ग्राहक आयोगातील स्टेनो रंजना शिंदे, ई. उपस्थित होत्या. यावेळी ग्राहक आयोगातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांचा सत्कार केला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *