ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रभाग क्र.3 मध्ये शमा बाजी खान यांच्यासह शेकडो कार्यकत्यांचा भाजपात प्रवेश

October 28, 202113:57 PM 19 0 0

जालना (प्रतिनिधी):-भारतीय जनता पार्टी जालना तर्फे जालना शहरात विविध भागात ना.रावसाहेब पाटील दानवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती उप सभापती भास्करराव पाटील दानवे व भाजपा शहराध्यक्ष मा.राजेशजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ने जालना शहरात केलेल्या विकास कामांच्यामुळे प्रभावीत होऊन इतर पक्षातुन मान्यवर भाजपा मध्ये प्रवेश घेत आहेत. दि.26 ऑक्टोंबर 2021 रोजी शकुंतला नगर प्रभाग क्र.03 मधील सर्व परिचीत सौ.शमा बाजी खान यांनी व त्याच्यासोबत शेकडो महिला सहकारी व कार्यकर्त्यासह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश घेतला आहे. येणाऱ्या नगर पालीका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी उमेदवारी देईल त्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडुण आणण्याचा संकल्प प्रभागातील नागरीकांनी काल प्रवेश कार्यक्रम प्रसंगी बोलून दाखविला. यापुर्वी इतर राजकीय पक्षामध्ये काम करुन देखील दखल घेतली नसल्यामुळे प्रतिष्ठीत नागरीकांचा भारतीय जनता पार्टीकडे ओढा वाढलेला आहे.


या प्रसंगी जिल्हा संघठण सरचिटणीस सिध्दीविनायक मुळे,शहर सरचिटणीस प्रा.दिलीप अर्जुने,शेखर उर्फ सनि बुंदेले, डोंगरसिंग साबळे, ममताताई कोंडयाल, जमिल भाई, रंजनाताई शेळके, पार्वती पतंगे, अब्ब्राझ खान, विकास डिलपे,प्रशांत चिटवार,फेरोज खान,सोनु जाधव, अमरसिंग ठाकूर, श्रीकांत पांगारकर, विजय मुंढे,आशा मुंढे,विशाल डोंगरे,गणेश कायंदे,चंदा शेळके,रेशमा ईनामदार,आयुब शेख,सुनिल मळेकर,शिंवम सुरासे,राहुल मकासरे,रमेश वाघमारे यांच्यासह मोठया संख्येने उपस्थीत होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *