ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जासई ते गव्हाणफाटा, विर्गो यार्ड ते पागोटे दरम्यान एनएच 4 – बी या दोन्ही मार्गावरील दुतर्फा उभ्या असलेल्या शेकडो अवजड वाहनांमुळे वाहतूकीची कोंडी

October 23, 202114:26 PM 72 0 0

उरण ( संगिता पवार ) जासई ते गव्हाण टाकी आणि विर्गो यार्ड ते पागोटे दरम्यान एनएच 4 – बी या दोन्ही मार्गावरील रहदारीच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी शेकडो अवजड वाहने दुतर्फा उभी करुन ठेवली जात आहे. अशा बेशिस्त अवजड वाहनांच्या रस्त्यावरील दुतर्फा अडथळ्यांमुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.अशा बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष सुधीर घरत यांनी वाहतूक विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एनएच – 4 बी महामार्गावरून विरगो यार्ड ते पागोटे आणि गव्हाणफाटा ते जासई या दरम्यान दररोज हजारो वाहने मार्गस्थ होतात.या रस्त्यावरुन अनेक कंटेनर यार्डमध्ये मोठ्या प्रमाणावर अवजड कंटेनर मालाची वाहतूक होते. मात्र या दोन्ही मार्गावरील रस्त्यांवर शेकडो अवजड वाहने दुतर्फा रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभी करून ठेवलेली असतात.दिवसरात्री हजारोंच्या संख्येने होणाऱ्या अवजड वाहतूकीला अशा या दुतर्फा रस्त्यावरील बेशिस्त उभी करण्यात आलेली वाहने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करतात.त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यातच जासई उड्डाण पुलाच्या सुरू असलेल्या कामामुळेही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे.


त्यामुळे सदर रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या प्रवासी वाहनांना अशा बेशिस्त अवजड वाहनांच्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे रात्री अपरात्री सदर रस़्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते.त्याशिवाय अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.अशा बेशिस्तपणे दुतर्फा उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे रात्री अपरात्री सदर रस्तावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.वारंवार उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करणाऱ्या मोटारसायकल स्वारांनाही अपघाताला सामोरे जावे लागत आहे.तसेच रुग्णवाहिका सेवेला अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.यामुळे नागरिकांचा नाहक वेळ वाया जातो.इंधनाचाही अपव्यय होत आहे.यामुळे जनसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे.त्याचा केव्हाही भडका उडण्याची शक्यता आहे.
यामुळे दुतर्फा उभ्या करण्यात येत असलेल्या अशा बेशिस्त अवजड वाहनांवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी काल भाजपाच्या ट्रान्सपोर्ट सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर घरत यांनी मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे आणि उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी भेट घेतली.जासई ते गव्हाण टाकी आणि विरगो यार्ड पागोटे दरम्यान एनएच 4 – बी या दोन्ही मार्गावरील बेकायदेशीर दुतर्फा पार्किंग बंद करण्यात यावी रहदारी दरम्यान वाहतूक कोंडीची समस्या दूर करुन नागरिकांना दिलासा देण्याची मागणीही वाहतूक विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ ठाकूर,उरण तालुका सरचिटणीस दिपक भोईर उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *