ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पत्नीची माहेरी जाऊन पतीने केली हत्या

February 9, 202212:10 PM 40 0 0

लातूर : पतीनेच पत्नीची हत्या  केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गळा चिरुन विवाहितेचा खून करण्यात आला. लातूर शहरातील अवंती नगर भागात ही घटना घडली. रेश्मा अब्दुल शेख असं वीस वर्षीय मयत महिलेचं नाव आहे. अवघ्या तीन वर्षांपूर्वी महिलेचा निकाह झाला होता. मात्र लग्नानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत असल्याची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या वादानंतर विवाहिता आपल्या माहेरी गेली होती. रेश्मा आई-वडिलांसोबत राहत होती, मात्र घटनेच्या दिवशी ती एकटीच होती. पत्नी माहेरी एकटीच असल्याची संधी साधून पतीने घर गाठलं. त्यानंतर तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
लातूर शहरातील अवंती नगर भागात राहणाऱ्या एका विवाहितेची हत्या करण्यात आली. महिलेची तिच्याच पतीने निर्दयीपणे गळा चिरुन हत्या केल्याची घटना घडली आहे. दोघांमध्ये सतत भांडणं होत असल्याचा दावा केला जातो. रेश्मा अब्दुल शेख (वय 20 वर्ष) असं खून करण्यात आलेल्या विवाहितेचं नाव आहे.
तीन वर्षांपूर्वी विवाह, पदरात लहान मूल
रेश्मा आणि अब्दुल यांचा 2019 मध्ये निकाह झाला होता. त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे. पती अब्दुल शेख याच्याशी रेश्माचे सतत वाद होत असल्याने रेश्मा ही आपल्या आई-वडिलांकडे राहत होती.
तीक्ष्ण हत्याराने वार
मंगळवारी रेश्माला घरात एकटे गाठून आरोपीने तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत तिची हत्या केली. पोलिसांनी आता आरोपी पतीला अटक केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *