तूच आहेस आई ,
माझ्या जीवनाची शिल्पकार
तू जन्म दिलास आणि ,
तूच मला घडवलंस,
कोळशाच्या खाणीत राहून
आई तूच मला चमकवलस
म्हणूनच माझ्या जीवनात आई
तू परिसाहून परीस आहेस
लोखंडाचं सोनं करणारी
उपजत सोन्याची खाण आहेस..
या चिमुकल्या रोपट्यास
तूच खतपाणी घातलंस
अन आकाशाला भिडणारी स्वप्नं तूच बघायला शिकवलंस….
ती स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून आई
तू अतोनात कष्ट केलंस
उपाशी -तापाशी राहून …आई
तू मला पोटभर जेवू घातलंस
आई कसा गं तुला कशाचाच मोह नाही
बाबांच्या स्वप्नातला समाज घडवायचा
अन एक नवा इतिहास रचायचा
त्या इतिहासाचे धडे
आई तूच मला दिलेस
तूच बाळकडू पाजलस
प्रेमाशिवाय जगताना
प्रेमानं जगण्याचं…
मृदुमयी मन अन शरीर
तरीही पाषाणासारखं झुंजण्याचं
तुझ्या प्रेरणेनं आई
माझ्या पंखांना बळ दिलं
तुफानातही नांदण्यासाठी
लव्हाळीसारखं मन दिलं
– सौ.विद्या निकाळजे
( सातारा)
Leave a Reply