ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आई

May 8, 202113:01 PM 21 0 0

आई म्हणजे स्वप्नांचा भार
आई म्हणजे पैश्यांवरून वाद
आई म्हणजे डाटफटकार
आई म्हणजे दु:खाचाच काळ
आई म्हणजे मोठेपणाचा कळस
आई म्हणजे व्देष
आई म्हणजे क्लेष
आई म्हणजे फक्त फक्त आणि फक्त
कटू आठवणिंचीच वेल…..

आई म्हणजे माझ्यावरचं नि:स्वार्थ प्रेम
आई म्हणजे व्यक्तिमत्वातलं तेज
आई म्हणजे माझ्या ध्येयातल बिज
आई म्हणजे माझ्या पाठीतलं बळ
आई म्हणजे माझी ऊर्जा
आई म्हणजे माझ्या यशाचीच चर्चा
आई म्हणजे माझ्या विचारांची स्फुर्ती
आई म्हणजे माझ्या आचारातली मूर्ती
आई म्हणजे माझ्या निर्भयतेची ढाल
आई म्हणजे आत्मविश्वासाची नाळ
आई म्हणजे फक्त माझंच हीत…..

आईचं अगाध प्रेम उमगायला
थोडा ऊशीर झालायं खरा
तरीही….
आई तू आज असतीस तर
असं मी काही म्हणणार नाही
कारण माझ्या कडून जे झालय
ते सत्य काही केल्या बदलणार नाही ..

काळ सरला वेळ सरली
मात्र आज
आई तुझी महती
माझ्या काळजात
कायमची स्मरली……
■■■■■■■■■■■

कवयित्री इंन्दा पी.

Categories: कविता, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *