खालापूर : नुकताच शिवसेनेने खालापूर तालुक्यातील आढावा बैठक तांबाटी येथे घेतली होती यावेळेस सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी वर शरसंधान साधत थेट पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर निशाणा साधल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही त्याच तांबाटी येथे शिवसेनेला चोख उत्तर देण्यासाठी वडगाव जिल्हा परिषदेची आढावा बैठक बोलविली होती यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह या सभेचे मार्गदर्शक राष्ट्रवादी चे रायगड जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड, तालुकाध्यक्ष तथा जी प सदस्य नरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या पदमा ताई पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, उपसभाती विश्वनाथ पाटील, महिला तालुकाध्यक्ष श्वेता मनवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष भूषण पाटील, तालुकध्यक्ष कुमार दिसले, विद्यार्थी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद पाटील, तालुका कार्यध्यक्ष प्रवीण गोपाळे, युवती तालुकाध्यक्ष पूजा धरणे, वडगाव जी प अध्यक्ष जितेंद्र सकपाळ ,महिला जिल्हा परिषद वडगाव अध्यक्षा पूजा खाडे, विद्यार्थी संघटना खालापूर अध्यक्ष शुभम सकपाळ, जिल्हा सरचिटणीस सुरेश पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार पाटील यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
जनतेने राष्ट्रवादीचा खडतर काळ असताना राष्ट्रवादी ची विचारधारा झालेला विकास मतदारासमोर पोहचवून मागील काळात तीन जिल्हा परिषद व पंचयत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व सिद्ध करून दिले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास कामे करता आली आता आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी बूथ कमिटी स्थापन करून गावागावात त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठक लावण्यात येतील असे सांगत, कार्यकर्त्यांनो तुम्ही वाघाच्या डरकाळ्याना लक्ष देऊ नका आपण विकासाच्या माध्यमातून जनतेच्या मनात घर केले आहे कामगार भरती चा मुद्दा निवडणुकीसाठी घेऊन कारखान्यांना त्रास देण्यासाठी काही लोक दिशाभूल करण्याचे काम निवडणुक डोळ्यासमोर ठेवून करत आहेत परंतू आपण स्वस्त न बसता माजी आमदार सुरेश लाड यांच्या माध्यमातून जी विकास कामे झाली आहेत ती जनते पर्यत पोहचविण्याचा काम करा व आगामी निवडणुकासाठी सज्ज व्हा आणि राष्ट्रवादी नंबर वन आहे आणि आगामी काळात पण राहणारच असा सल्ला जि प सदस्य तथा तालुकाध्यक्ष नरेश पाटील यांनी दिला.
यावेळी या बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी शिवसेनेने केलेल्या आरोपाला उत्तर दिले. राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुरेश लाड यांनी मार्गदर्शन करताना लोकशाहीत जनतेने दिलेला कौल मान्य आहे आपण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रोजगार देण्याचा बाऊ करून स्वताची पोळी भाजण्यासाठी कारखानदारीला त्रास देण्याची भाषा करू नका. स्थानिक भरती झालीच पाहिजे या भूमिकेत आम्ही ही आग्रही आहोत पण सध्या कोरोना मध्ये प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वाईट आहे, म्हणून असणाऱ्या कामागारावर गदा आणण्याचे काम करू नका आणि जनतेची दिशाभूल करून पदाचा गैर वापर करून स्वताची पोळी भाजण्यासाठी स्थानिक कामगारांना बेघर करू नका असा सल्ला देत आपण कधी कुठल्याच गेट वर जाऊन ठेका मागितला नाही रस्त्याच्या काम असो किंवा शेकऱ्याच्या शेतीमधून लाईन टाकण्याचे कामत ठेका मागितला नाही केवळ कामगार ,शेतकरी यांच्या प्रश्नासाठी झटलो आणि स्थानिकांना ही परिस्थिती ची जाणीव करून दिली असे सांगून प्रत्येक वेळेस राष्ट्रवादी ने आम्हाला फसवले असा बिनबुडाचा आरोप करून स्वबळाचा नारा देत आहेत तर ” आरे खरच फसवलं असेल तर मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यालया सांगा आणि महाविकास आघाडी मधून बाहेर पडा ” असे शरसंधान साधन आमचे नेते खासदार सुनील तटकरे हे महाराष्ट्राचे नेते आहेत कोकण चे भाग्यविधाते आहेत त्यांची तुम्ही बरोबरी करू शकत नाही असा आमदार थोरवे यांचे नाव न घेता लाड यांनी टोला लगावला. तालुक्यात राष्ट्रवादी मजबूत आहे आणि राहणार असे सांगून कार्यकर्तानो तुम्ही आघाडी होईल न होईल आपण मजबूत आहोत वरिष्ठ पातळीवरील नेते जो आदेश देतील तो मान्य करू पण सध्या आपण आगामी निवडणुकीसाठी कामाला लागा असा सल्ला लाड यांनी कार्यकर्त्याना यावेळी दिला.
Leave a Reply