ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुर्ववत न बसविल्यास संपुर्ण महाराष्ट्र पेटवू :  अरविंद देशमुख

February 17, 202213:09 PM 31 0 0

जालना (प्रतिनिधी) ः जालना तालुक्यातील सेवली येथील शासकीय जमिनीवर परवा मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली होती. मात्र काही राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी स्टंटबाजी केली. त्यामुळे पुतळा स्थापनेला धार्मिक वळण देवून स्थापन करण्यात आलेला पुतळा जिल्हा प्रशासनाकडून रातोरात हटविण्यात आला.

यामुळे मराठा समाजाच्या भावनेला ठेस पोहचली असून जिल्हा प्रशासनासह त्या राजकीय नेत्यांचा मराठा महासंघाच्या वतीने निषेध करण्यात आला. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असलेल्या 19 फेबु्रवारी पर्यंत पुतळा पुर्ववत न बसविल्यास संपुर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटवू असा ईशारा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, कोषाध्यक्ष अशोक पडूळ यांनी आज दि. 16 फेबु्रवार रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे निदर्शने प्रसंगी दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख म्हणाले की, शेवली येथे समस्त गावऱ्यांच्या आणि सर्व जाती धर्मातील लोकांच्य उपस्थितीत बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा काही राजकीय लोकांनी स्टंटबाजी केल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा पुतळा हटविण्यात आला. पुतळा 19 फेबु्रवारी पर्यंत न बसविल्यास मोठे जनआंदोलन उभे करून असा ईशारा देशमुख यांनी यावेळी बोलतांनी दिला. या निदर्शनामध्ये जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, कोषाध्यक्ष अशोक पडूळ, युवक जिल्हाध्यक्ष शुभम टेकाळे पाटील, संतोष कऱ्हाळे, शिवजयंतीचे अध्यक्ष अर्जुन राऊत, किरण राजे देशमुख, करण जाधव, आकाश जगताप, शुभम चव्हाण, कमलेश पाटील आदींचा सहभाग होता.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *