जिथे जिथे झाला बलात्कार
तिथे शिवबा तुझी तलवार हवी होती
भिमा तुझ्या कायद्याची
त्या तलवारीला धार हवी होती……
जिथे जिथे होतोय अन्याय,अत्याचार
तिथे शिवबा तुझा धाक हवा होता
भीमा तुझ्या संविधानाचा
त्यावर उपचार हवा होता…….
जिथे जिथे स्त्रीचा अपमान होतो
तिथे शिवबा तुझा विचार हवा होता
भीमा तुझ ते “हिंदू कोड बिल”
स्त्रीयांना ही कळायला हवा होता…….
जिथे जिथे धर्माचा बाजार भरतो
तिथे शिवबा तुझ “स्वराज्य” हव होत
अठरापगड जातींचा या स्वराज्यात
मावळ्यांनी घर भरायला हवं होत……..
शेतकऱ्याच्या त्या कृषी कायद्यावर
रयतेचा वाली “शिवबा”हवा होता
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी
गांधी तुझा सत्याग्रह हवा होता……….
जिथे जिथे होतात दंगली अन मोर्चे
तिथे गांधी तुझी प्रतिमा हवी होती
त्या फडफडण्याऱ्या तिरंग्या खाली
रंगाच्या झेंड्याना आग लावायला हवी होती……
✍️राजू गायकवाड(#कविराज)
9604891674
अनिल गायकवाड -
खूप छान राज
अनिल गायकवाड -
very nice raj