ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ध्येय निश्चित करून ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल केल्यास निश्चितच यश मिळते : डॉ.शुभांगी वाघमारे

October 30, 202114:07 PM 25 0 1

सातारा (विद्या निकाळजे ) : आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याने एक ध्येय निश्चित करून ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल केल्यास निश्चितच यश मिळेल,असे मत डॉ.शुभांगी वाघमारे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत डॉ. वाघमारे यांनी पशुधन विकास अधिकारी वर्ग एक या पदाला गवसणी घालून समस्त सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे आदर्श निर्माण केल्याबद्दल म्हसवड ता. माण येथील जयभीम युवक मंडळामार्फत आयोजित नागरी सत्काराला उत्तर देताना डॉ.शुभांगी वाघमारे बोलत होत्या.


पुढे मार्गदर्शन करताना डॉ.शुभांगी म्हणाल्या की, एमपीएससीचा अभ्यास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक वेळा यश हातातून निसटून जाते मात्र अशा वेळी खचून न जाता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना म्हसवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हे म्हणाले की, जीवन खूप सुंदर आहे जो प्रयत्न करतो तोच जीवनात यशस्वी होतो.प्रत्येकाच्या जीवनात एक टर्निंग पॉइंट नक्कीच येतो फक्त संधीचे सोने करता आले पाहिजे.
कार्यक्रमात डॉ. शुभांगी ,त्यांची आई सत्यभामा वाघमारे ,त्यांचे वडील माजी सैनिक आदिनाथ वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.म्हसवड येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमास सिद्धनाथ माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ट विद्यालयाचे प्राचार्य प्रवीण दासरे,बामसेफचे जिल्हा संघटक कैलास तोरणे ,शिक्षक समितीचे सरचिटणीस काशिनाथ तोरणे ,राजाराम तोरणे,विजय शिंदे ,कुमार सरतापे ,अंगुली बनसोडे ,पत्रकार एल के सरतापे,पत्रकार सुशील त्रिगुणे,नंदकुमार तुपे,युवराज सरतापे आणि समस्त बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
यावेळी कैलास तोरणे,प्राचार्य प्रवीण दासरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार तोरणे यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *