ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

म.गांधींना समजून घ्यावयाचे असेल तर ‘माझे सत्याचे प्रयोग’ वाचले पाहिजे-विदयाताई निकाळजे यांचे आवाहन

October 3, 202113:20 PM 14 0 1

सातारा (प्रतिनिधी) : ‘इतिहास हा फक्त वाचायचा नसतो किंवा ऐकायचा नसतो तर तो आपल्या जीवनात आत्मसात करुन घडवायचा असतो ‘असे प्रतिपादन अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्राच्या कार्यकारी संपादक विदयाताई निकाळजे यांनी केले. गोंदवले बुद्रुक येथील पोदार जम्बो किड्स या शाळेत लालबहादूर शास्त्री आणि म. गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सौ. विद्याताई अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या . म.गांधी यांच्याविषयी बोलताना विद्याताई म्हणाल्या की,प्रत्येकाने आपल्या जीवनात एकदातरी म.गांधीजींचे माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचलेच पाहिजे .म.गांधीजी आपल्याला समजायला नक्कीच मदत होईल,तसेच गांधीजींनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेला निशस्त्र लढा हे अहिंसेचे उत्तम उदाहरण आहे तो लढा आपणासाठी प्रेरणादायक आहे.गांधीजींचे सत्याचे तत्व माणसाला जगताना निर्भीड बनवते ,प्रसंगी अडचणी येतात परंतु अंतिम विजय सत्याचाच होतो हे आपणास समजते. लाल बहादुरशास्त्री यांच्या जीवनावर म. गांधीचा प्रभाव होता व त्यामुळे १४ व्या वर्षी शिक्षण सोडून महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले व अखंड लढा दिला आणि त्यांनी भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून कार्यभार पाहिला.


दहिवडी माजी नगराध्यक्ष सौ साधनाताई गुंडगे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या,पोदार जम्बो किड्स शाळेविषयी बोलताना म्हणाल्या गोंदवलेकर महाराजांच्या छत्रछायेत वसलेले हे जम्बो किड्स चे रोपटे दिवसेंदिवस बहरत जावे.त्यासाठी शुभेच्छा दिल्या .तसेच गोंदवले बुद्रुक येथील ग्रामपंचायत सदस्य सौ. अनिता कट्टे याही त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या .
आज गोंदवले बुद्रुक येथील पोदार जम्बो किड्स, प्रि-प्रायमरी स्कूलमध्ये म.गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.
पोदार जम्बो स्कूलचे संचालक श्री. श्रीराम मोकाशी आणि श्री. सचिन भागवत हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. पोदार जम्बो स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया भागवत यांनी म. गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांचे देशाप्रती दिलेले योगदान विशद करुन
महात्मा गांधीजी हे पोदार एज्युकेशन नेटवर्कचे पहिले अध्यक्ष होते, हेही आवर्जून सांगितले. यावेळी पोदार जम्बो स्कूलच्या शिक्षिका सौ. मयुरी कट्टे, सौ. अपूर्वा कुबेर, सौ. मीरा इनामदार, कु. प्रिती तिवाटणे आणि सौ. स्वाती देसाई उपस्थित होत्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *