ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अरगडे गव्हाण येथील धोकादायक विजेच्या खांबाकडे वीजवितरण चे दुर्लक्ष

January 3, 202115:09 PM 118 0 0

जालना (प्रतिनिधी)  घनसावंगी तालुक्यातील अरगडे गव्हाण येथील एक लोखंडी खांब मागील पंधरा दिवसापासून तुटलेल्या अवस्थेत असून याबाबत ग्रामस्थांनी विजवतरण ला लेखी तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने गावांतील ग्रामस्थांना जीव धोक्यात देऊन ये जा करावी लागत आहे.

कुंभार पिंपळगाव पासून जवळच असलेल्या अरगडे गव्हाण गावातील मुख्य गल्ली भागातील प्रमुख ठिकाणी असलेल्या लोखंडी खांब हा खालून तुटल्याने खांब हा घरावर पूर्णपणे कोसळल्याने फक्त तारावरच शिल्लक राहिला आहे . सदर्भित रस्त्यावर दररोज गावातील ये जा चालू असते याबाबत वीज वितरणला अनेकवेळा सांगूनही उपयोग होत नसल्याने मात्र एखादी जीवितहानी झाल्यानंतर विजवतरण ला जाग येणार आहे की काय असा प्रश्न ग्रामस्थांतुन विचारला जात आहे .
खांब वाकल्यानंतर वीजपुरवठा वेळेवर बंद केल्याने मात्र अनेकांचे जीव वाचले नसता घरात विजेचा प्रवाह उतरला असता घटनास्थळी विजवतरण चे कर्मचारी व उपअभियंता यांनी पहाणी करून आठ दिवसांचा कालावधी उलटला आहे मात्र तरीही सदर्भित खांब काढणे किंवा उभा करण्याचे अद्यापही प्रलंबीत आहे .

याबाबत विजवतरण चे घनसावंगी अभियंता एम डी निमजे यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की लवकरच सदर्भित खांब उतरून नवीन खांब लावण्यासाठी मागिल आठवड्यात सांगण्यात आले आहे लवकरच काम पूर्ण केले जाईल.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *