कैलास गजर
जालना/प्रतिनिधी : जालन्यातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी विदेशी दारू विक्रीकडे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या सह बीट जमादारांचे दुर्लक्ष होत असल्याने अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आल्याचे पहावयास मिळतात आहे,
चंदनझिरा हद्दीत देशी विदेशी दारू विनासायास उपलब्ध असल्याने अनेक जन यांच्या आहारी जात असून, परिसरातील समकाजिक वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याच परिसरातील देशी विदेशी दारू विक्री व तस्करी जोमात सुरु असली तरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे व चंदनझिरा पोलिस ठाण्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड सुरू आहे. अवैध देशी विदेशी दारू पाठोपाठ बंदी घालण्यात आलेल्या गुटख्याची देखील विक्री राजरोसपणे या ठाण्याचा हद्दीत सूरू आहे जालना राजूर रोडवर अनेकदा काही दारुडे दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मात्र या सर्वप्रकाराचा त्रास हा सर्व सामान्य नागरीकांना सहन करावा लागत आहे, आज पर्यंत या प्रकरणी कोणतीच कारवाई न झाल्याने या भागातील दारू विक्रेत्यांची चलती विक्रेत्यांवर कारवाई न झाल्याने पोलिसांचे त्यांना अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे, याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस ठाण्याची डोळेझाक होत असल्याने अवैध दारू विक्रेत्यांना अभय मिळत असल्याने त्यांची मोठी चलती आहे, त्यामुळे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Leave a Reply