जालना-प्रतिनिधी जालना शहरात अवैधपणे विक्री होणाऱ्या गुटखा विक्रेत्यांवर आणि मटका चालवणाऱ्यावर कार्यवाही करून त्यांना हद्दपार करणे व विविध प्रकारचे अवैद्य धंदे शहरात काही ठिकाणी खुलेआम तर काही ठिकाणी छुप्या पद्धतीने ऑनलाईन लॉटरी, जुगार, मटका आकडे घेणे व आकडे लावण्याचा धंदा सुरु आहे. हा प्रकार शासनाच्या कर्मचाऱ्यांना व पोलिसांना माहीत नाही अशातला भाग नसुन त्यांना माहित असतांना देखील हे सुरु आहे. या प्रकरणी आजपर्यन्त पोलीसांनी केवळ गुन्हे दाखल केले असुन संबंधीत पुन्हा पुन्हा तोच गुन्हा करत आहे.
अशीच काहीशी बाब हि गुटखा विक्रेत्याच्या बद्दल देखील आहे. शहरासह आपल्या कार्यालय परिसरात बंदी असलेल्या गुटख्याची खुलेआम विक्री होत असुन आपले कर्मचारी देखील याचा स्वाद घेतात. मात्र या गुन्हेगारांना आपल्या विभागाचा धाक नसल्याने ते अवैधपणे हे धंदे करत आहेत. मटका, सट्टा यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तरी पोलिस अधिक्षक व जिल्हा निरीक्षक अन्न व औषध प्रशासन यांनी या प्रकरणी लक्ष घालुन पोलीस विभागाची बदनामी टाळावी व संबंधीत आरोपींच्या विरोधात कडक कार्यवाही करावी, त्यांना जिल्ह्यातुन हद्दपार करावे नसता अखिल भारतीय सेना जालनाच्या वतीने जिल्हाभर आंदोलने, रास्ता रोको व उपोषणे करण्यात येईल. या आंदोलनात बरेवाईट काही झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील, अशी मागणी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर जालना शहर प्रमुख उमेश खाकीवाले, जालना शहर संघटक अनिल वानखेडे, शहर सचिव सुंदर सगट, विभाग प्रमुख आनंद बोराडे, शाखा प्रमुख अर्जुन फत्तेलष्करी, आकाश घाटोळे, संतोष गायकवाड, दुर्गेश पाचपिंडे, अशोक यादव, विश्वनाथ आढाव, गोपाल चौधरी, शिवाजी म्हस्के, लालु गोमतीवाले आदींचे स्वाक्षऱ्या आहेत.
Leave a Reply