ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना नगर पालीकेतील गैर कारभाराची तात्काळ चौकशी करा – शेख माजेद

July 9, 202112:44 PM 7 0 0

जालना (प्रतिनिधी) ः जालना नगर पालीकेत अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांनी संगनमत करुन जनतेच्या सेवेसाठी आलेल्या निधीचा दुरुपयोग केला जात आहे, जतन करुन ठेवण्यात आलेले रेकॉर्डचे कागदपत्र जाळून टाकले जात आहेत. तसेच बोगस मुदतठेव पावत्याच्या आधारे पालीकेचे कंत्राट घेतले जात आहेत. स्वच्छतेच्या नावाखाली करोडो रुपयाचा निधी लाटला जात आहे, परंतु कामे केली जात नाहीत, या सह अनेक गैर कारभार जालना नगर पालीकेत सुरु आहेत. या गैर कारभाराची तात्काळ चौकशी करुन दोषी लोकावर तात्काळ गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यात यावी अशी मागणी ए.आय.एम.आय.एम. चे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी केली आहे.


या संदर्भात जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, नगर विकास मंत्री यांच्यासह विभागीय आयुक्तांना तक्रार दाखल केली आहे. जालना नगर पालीकेच्या नावे बनावट मुदत ठेव पावती दिल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. तसेच स्वच्छतेचे करोेडो रुपयाचे टेंडर एका निजी संस्थेला दिले असतांनाही शहरातील सर्वच भागात अस्वच्छता आहे. स्वच्छतेची कामे केली जात नाही, घंटा गाड्या देखील बंद आहेत. पालीकेच्या जबाबदार अधिकार्‍यांनी कोणत्याही कामाची सत्यता पडताळून पाहणे अत्यंत गरजचे होते. परंतु चिरी-मिरी घेऊन कागदपत्र न तपासताच बोगस कामे केली जात आहेत. त्यामुळे अशा बोगस कंत्राटदारांची व त्यांना सहकार्य करणार्‍या पालीकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची तात्काळ चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी ए.आय.एम.आय.एम. चे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी केली आहे.
जालना नगर पालीकेचा रेकॉर्ड रुम जळाला नसून तो जाळण्यात आला आहे. या संदर्भातील चौकशी देखील प्रलंबीत आहे. दोषी लोकांना वाचवणे आणि बोगस कामे लपवणे यासाठी हा प्रकार केला जात आहे. अशा गैर कारभारांना खतपाणी घालणे आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणे तात्काळ थांबवण्यात यावी. असेही दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *