महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन शाखा – वडवली आयोजित कोकणी डॉक्टर असोसिएशन अंतर्गत,हॉस्पिटल म्हसळा यांच्या सहकार्याने शुक्रवार दि.१७/९/२०२१ रोजी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले,सदर शिबिरामध्ये विविध आजारांवर तपासणी करून चिकीत्सा करण्यात आली,एकूण ३५४ रुग्णांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन लाभ घेतला.
या कार्यक्रमाप्रसंगी अखंड आगरी समाज अध्यक्ष श्री.संतोष रामा नाक्ती, मनसे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष श्री.सुशांत सुधीर पाटील, मनसे तालुका सचिव श्री.सुमित सावंत, कोकणी डॉक्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.नसीम खान, उपसरपंच श्री.दिपक कांबळे, श्री.हरिचन्द्र चाळके, श्री.संतोष बाळाराम धुमाळ, श्री.नवनाथ कांबळे, श्री.महेश कांबळे, श्री.सुदेश पांडुरंग कांबळे, निलेश सहदेव नाक्ती, श्री.नवनाथ नाक्ती आदि मान्यवर उपस्थित होते. सदर शिबिरासाठी ४ तज्ञ डॉक्टर, २ नर्स, ३ मदतनीस स्टाफ यांच्या सहकार्याने सदर आरोग्य शिबीर उत्तम रित्या पार पडला. या शिबिरात विशेष बाब म्हणजे महिलांकरिता १०००(एक हजार) सॅनिटरी नॅपकिनचं वाटप करण्यात आलं. विशेष सहकार्य श्री.किरण गोविंद चाळके आणि नीलेश बारक्या नाक्ती यांनी के़ले.
Leave a Reply