ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

समाजाभिमुख कार्य करणारे अधिकारी महासंचालक बार्टी,पुणे श्री.धम्मज्योती गजभिये यांना पदावरून हटविण्याची कार्यवाही तात्काळ थांबवा- दिपक डोके मराठवाडा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी

October 4, 202113:34 PM 53 0 0

जालना.प्रतिनिधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे (महाराष्ट्र शासन – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था ) अंतर्गत महाराष्ट्रातील अनु.जातीतिल तसेच समाजातील दुर्बल व वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक विकासासह सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी बार्टी,पुणे मार्फत कर्तव्यदक्ष अधिकारी महासंचालक बार्टी,पुणे श्री.धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास मागील एक वर्षापासून आपल्या कौशल्याच्या जोरावर बार्टी संस्थेच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळातही अनेक समाजाभिमुख कामे केली असून अल्पावधीत संपूर्ण अनुसूचित जाती समाज व संघटनांमध्ये त्यांनी एक चांगला विश्वास निर्माण केला आहे.सध्या ते समाज कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रकल्प अधिकारी व समतादूत यांच्यामार्फत ५०,००० युवा गट निर्मिती प्रकल्पावर काम करीत असून त्यामाध्यमातून वंचितांचे आर्थिक उत्पन्न व नवउद्योजक घडविण्याच्या त्यांचा मानस आहे.या प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्राचे जेष्ठ नेते खा.शरद पवार करावे अशी त्यांची इच्छा आहे.


येणाऱ्या काळात जिल्हा स्तरावर प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करणे,युपीएसी एमपीएसी निवासी प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करणे इत्यादीसह बार्टी तर्फे अनेक महत्वाच्या लोकाभिमुख कार्यक्रमास चालना मिळावी व त्यानुसार कामकाज होईल असा त्यांना विश्वास आहे.त्यांच्या या नियोजनबद्ध कार्यप्रणाली मुळे नुकतेच निकाल लागलेल्या युपीएसी परीक्षेत बार्टी चे १८ पैकी एकूण १० विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे बेंचमार्क सर्हे सारखी महत्त्वाची कामे हाती घेऊन अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी ते महत्त्वाचे कार्य करत आहेत.अतिशय सकारात्मक कार्य करून बार्टीचे कार्य करणाऱ्या या अधिकाऱ्यांना वैद्यकीय रजेवर गेल्यानंतर षडयंत्र करून बदली करण्याचा डाव आज आखण्यात आला आहे.वैद्यकीय रजेवर तीन आठवड्यांसाठी गजभिये साहेब सुटीवर गेले असतांना काही उपद्रवी लोकांनी त्यांना कायमच हटवून दुसऱ्याला महासंचालक पदी बसविण्याची तयारी चालवली आहे. खूप वर्षांनी बार्टी ला एक सक्षम अधिकारी भेटला असून त्यांना अश्या पद्धतीने जर डावलण्यात येत असेल तर-हे योग्य नाही.अलीकडे महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या अधिकाऱ्यांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले असून हे जर थांबले नाही तर आंबेडकरी जनता आता रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याचा ईशारा निवेदनात दिले आहे. कार्यालय या परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पडलेले प्रश्न पुढीलप्रमाणे.. धम्मज्योती गजभिये सारख्या कार्यक्षम अधिकाऱ्यांवर सक्तीच्या रजेचा बडगा कशासाठी ? सामाजिक न्याय विभागाला कर्तव्यदक्ष,वंचित घटकांच्या न्याय-हक्कांसाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे अधिकारी नको आहेत का? सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेल्या बार्टी संस्थेच्या महासंचालक गजभिये यांना तातडीने सक्तीच्या रजेला पाठवून काय साध्य करायचे आहे ? बार्टी संस्थेत या अगोदर होणारे घोटाळे यांची चौकशी लावल्याचे बक्षीस गजभिये यांना सक्तीच्या रजेवर पाठवून दिले आहे का? अनुसूचित जातीच्या सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक निकषांवर सर्वेक्षण सुरु करणाऱ्या बार्टी संस्थेच्या महासंचालक गजभिये यांचा शासनातील वरिष्ठांना एवढा तिरस्कार का ? कोरोना महामारीत संपूर्ण ताळेबंद परिस्थिती असतानाही बार्टी संस्थेत ऑनलाइन प्रशिक्षणाच्या माध्यमातून एमपीएससी,पोलीस भरती,यूपीएससी प्रशिक्षण चालू ठेवणाऱ्या व यूपीएससी परीक्षेत १८ पैकी १० विद्यार्थ्यांची वर्मी लावणाऱ्या कर्तव्यदक्ष महासंचालक गजभिये यांना सक्तीची रजा कशासाठी ? दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना २ लाख रुपयांचे विशेष अनुदान प्राप्त व्हावे यासाठी झटणाऱ्या व संपूर्ण महाराष्ट्रातील बेरोजगार व व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून पन्नास हजार युवा गट निर्माण करून वंचितांना लाभ मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या महासंचालक गजभिये यांच्यावर अन्याय करून काढून टाकण्यात येईल का ? अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मूलभूत प्रश्नांवर छत्तीस जिल्ह्यांमध्ये संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करून सडेतोड काम करण्यासाठी प्रयत्नशील असणारे बार्टीचे महासंचालक गजभिये सामाजिक न्याय विभागाला जड झाले आहेत काय? नुकतेच महाराष्ट्र शासनातर्फे एक कार्यलयीन परिपत्रक जाहीर झाले असून त्यामध्ये बार्टी पुणे चे संपुर्ण महाराष्ट्रात बाह्य स्रोताद्वारे गेली ६ वर्षांपासून कार्यरत प्रकल्प अधिकारी व समतादूत म्हणून कार्यरत असलेले क्षेत्रीय कर्मचारी यांना समाज कल्याण कार्यालयासोबत सक्रिय कामकाज करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत तरी सदर मनुष्यबळाचे नियमित व कायमस्वरूपी पुनर्वसन करून सदर कर्तव्यदक्ष मनुष्यबळास योग्य न्याय मिळावा ही सुद्धा मागणी आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे.तरी सदर निवेदनाद्वारे आपणास विनंती करण्यात येते की,समाजाभिमुख कार्य करणारे अधिकारी महासंचालक बार्टी,पुणे श्री.धम्मज्योती गजभिये यांना पदावरून हटविण्याची कार्यवाही तात्काळ थांबवावी. निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देन्यात आले निवेदनात मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष दिपक डोके, विष्णु खरात, प्रदीप सरकटे दिपक जाधव रेखा बोर्ड नितिन काळे आदिच्या साक्षरी आहेत

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *