ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे दहा दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन

September 21, 202113:15 PM 15 0 0

उरण (संगिता पवार ) दहा दिवसाच्या मुक्कामा नंतर रविवार ( दि. १९ ) रोजी गणरायाचे विसर्जन करण्यात आले . उरण नगरपरिषद च्या वतीने मोरा जेट्टी ,भवरा तलाव ,व उरण नगरपरिषदेचे विमला तलाव येथे गणपती व गौरी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती , विमला तलाव येथे आमदार महेश बालदी , नगराध्यक्षा सायली म्हात्रे ,भाजपा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर ,उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह ,नगरसेवक राजेश ठाकूर ,नगरसेविका जानव्ही पंडीत ,,मुख्याधिकारी संतोष माळी , सर्व नगरसेवक ,नगरसेविका ,उरण नगरपालिका कर्मचारी ,आदी उपस्थित होते . यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्था करण्यात आली होती .


देऊळवाडी युवक मंडळ व ग्रामस्त यांच्या वतीने गणपती व गौरी मातेला विसर्जनाचे काम करण्यात आले होते .सिव्हील डिफेन्स चे विलास पाटील व टीम ,उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
उरण नगरपरिषद चे आरोग्य निरीक्षक हरेश तेजी सह कर्मचारी २० व देऊळवाडी युवक मंडळ व ग्रामस्त सुमारे २५ युवक ,आदी विसर्जन ठिकाणी उपस्थित होते

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *