ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना जिल्ह्यात एसटी संप व पेट्रोल दरवाढीमुळे प्रवासावरील परिणाम

April 7, 202215:32 PM 41 0 0

जालना प्रतिनिधी: राजकिरण लिहिणार मराठवाड्यातील जालना जिल्हा स्टील उद्योगासाठी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे. जालना औरंगाबाद हा औद्योगिक पट्टा विकसित होत आहे. हा जिल्हा 1982 साली औरंगाबाद जिल्ह्यातून विभक्त झाला आहे. येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एसटी, टॅक्सी मोटर सायकल, खाजगी चारचाकी दुचाकी वाहन तसेच सायकल या वाहनाच्या आधारावर चालते. जालन्यात विविध कंपन्या व महाविद्यालय आहेत. येथे येणाऱ्या कर्मचाऱ्यांची व विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे. जालना शहरालगतच्या एमआयडीसी मधील बेरिंग च्या कंपनीत काम करणारे परमेश्वर जराड रोज एसटीने जालन्याला खेडेगावातून येणे-जाणे करायचे. पण एसटी बंद झाल्याने त्यांचा येण्या-जाण्याचा प्रश्न निर्माण झाला. ते आता तीन चाकाच्या रिक्षाने प्रवास करतात त्या रिक्षाचे भाडे एसटी चा पर्याय नसल्याने दुप्पट वाढले आहे. त्यांना कंपनीतून महिन्याला दहा हजार रुपये एवढा पगार मिळतो. त्यामधून 3500 रुपये गाडीच्या प्रवासासाठी खर्च येतो. खाजगी वाहने वेळेवर येतही नाहीत.
प्रीती लिहिणारेही काटखेडा गावातून रोज जालन्याला महाविद्यालयीन शिक्षणासाठी ये-जा करते. तिला शासनाकडून मोफत एसटीच्या प्रवासासाठी पास मिळाला आहे. पण आता एसटीच्या संपामुळे तिचा प्रवास खर्च खूप वाढला आहे. तिचे आई वडील शेतीत काम करतात महिन्याला तीन हजार रुपये येण्याजाण्याचा खर्च तिला परवडत नाही म्हणून ती आता आठवड्यातून फक्त दोनदाच महाविद्यालयात जाते. त्यामुळे तिचे शैक्षणिक नुकसान न भरून येण्या सारखे आहे.
मोटरसायकल चालक हे सुद्धा वाढत्या पेट्रोलच्या दरामुळे हवालदिल झाले आहेत. पेट्रोलचा दर लिटरमागे 110 रुपयापेक्षा अधिक आहे. एका ट्रॅक्टर च्या कंपनीत काम करणारे व दुचाकीवरून नियमित प्रवास करणारे उद्धव चोरमारे सांगतात की ‘ आता ही मोटरसायकल मला भंगार मध्ये विकायची इच्छा झाली आहे.’ या बदल्यात एक सायकल खरेदी करावी वाटत आहे. ते दररोज ट्रॅक्टर च्या कंपनीची मार्केटिंग करत संपूर्ण जिल्हाभर फिरतात. पण वाढत्या पेट्रोलच्या दरामुळे त्यांच्या फिरण्यावर मर्यादा आल्या आहेत.
गोलापांगरी नेहरू विद्यालयात शिकणारा विद्यार्थी आदित्य रोज सायकलीने शाळेत प्रवास करतो. त्याने सायकल घेण्यासाठी वडिलांना हट्ट धरला होता. वडिलांनी सायकल खरेदी करून दिल्यानंतर तो दररोज शाळेत जातोय. नवीन सायकल आल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सायकल मोटर सायकल तसेच चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या इतर प्रवासी पेक्षा सायकलीवरून प्रवास करणारा आदित्य मात्र सर्वात जास्त समाधानी वाटत होता.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *