ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी योजनांची प्रभावीपणे व गतीने अंमलबजावणी करा – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे

January 22, 202120:16 PM 104 0 0

जालना दि. 22 :- सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनामार्फत अनेक योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतात. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी योजनांची प्रभावीपणे व गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा दिशा समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री दानवे बोलत होते.

व्यासपीठावर आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्रीमती कल्पना क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री दानवे म्हणाले, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन योजनेंतर्गत परतुर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मिनी एमआयडीसी प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असुन या प्रकल्प राबविण्यासाठी काही अडचणी असतील तर त्या केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करुन सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन अनेक विकासकामांसाठी निधी मिळण्याबरोबरच मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करनु देण्यात येते. एमआरईजीएसच्या माध्यमातुन करण्यात येणाऱ्या कुशल व अकुशल कामांचा 60:40 चे परिमाण मेंन्टेन राहील, त्याचबरोबर योजनेचा निधी व्यवगत होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही राज्यमंत्री श्री दानवे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी श्री दानवे यांनी प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजिटल इंडिया, दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योति योजना, अमृत योजना, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, सर्वशिक्षा अभियान, माधान्ह भोजन, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण), स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना आदी योजनांचाही सविस्तर आढावा घेत या योजना गतीने राबविण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

या बैठकीस समितीचे सर्व अशासकीय सदस्यांसह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *