ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ओबीसी क्रांतीकारी जनजागरण अभियाना निमित्त आज जालन्यात महत्वाची बैठक

July 22, 202112:37 PM 52 0 0

जालना (प्रतिनिधी) ः समस्त ओबसी क्रांतीकारी जनजागरण अभियाना निमित्त उद्या दि. 22 जुलै गुरूवार रोजी सकाळी 11 वाजता जालना शहरातील जुना जालना भागात असलेल्या पाठक मंगल कार्यालयात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असुन या बैठकीस ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समन्वयक अशोक पांगारकर यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहिती देतांना पांगारकर म्हणाले की, जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल, शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कराव अंबेकर व माजी आ. शिवाजीराव चोथे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार असुन समस्त क्रांतीकारी जनजागरण अभियान राजस्तरीय दौऱ्यात सहभागी झालेले


आ. राजेश राठोड, बबनराव तायवाडे, डॉ. डी. बी. चव्हाण, सुशिलाताई मोराळे मा. आ. रामराव वडकुते, मा. आ. नारायणराव मुंढे, बाळासाहेब सानप, कल्याणराव दळे, राजेंद्र राख, बालाजी शिंदे, नवनाथ पडळकर, अरुण खरमाटे, ईश्वर बाळबुधे, भानुदास माळी, श्रीमती साधना राठोड, सोमनाथ काशीद, शरद कोळी, फुलचंद कऱ्हाड, प्रा. धनंजय बेडदे, दादासाहेब मुंडे, नामदेवराव आयलवाडे, प्रकाश राठोड, धनंजय ओम्बासे, राज राजापुरकर राजू साळुंके, सचिन राजुरकर, कल्पनाताई मानकर, बाळासाहेब पांचाळ, विक्रम गोजमगुंडे, मच्छिंद्र भोसले, ॲड. पी. बी. कुंभार, राहुल जाधवर, बाळासाहेब गुरव, चेतन शिंदे हे पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये प्रामुख्याने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण, ओबीसी समाजाची जनगणना व अन्य प्रश्‍नांवर चर्चा होणार आहे. राज्यात व देशात ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्‍वभुमीवर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस ओबीसी समाजातील बंधु, भगीनी व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सर्वश्री अशोक पांगारकर, सत्संग मुंढे, बाबुराव सतकर, सुभाषराव वाघमारे, प्रा. भगवानसिंह डोभाळ, ओमप्रकाश चितळकर, भाऊसाहेब घुगे, प्रा. आत्मानद भक्त, विजय चौधरी, सुनिल खरे, उध्दव पवार, अविनाश चव्हाण, नारायण चाळगे, मोहन इंगळे, नवनाथ वाघमारे, अँड. संजय काळबांडे, बाबु पवार, संतोष जमधडे, दिपक बोऱ्हाडे, अशोक लांडे, विक्रम वऱ्हाडे, प्रा. कपील दहेकर, सुधाकर जाधव, दिपक दराडे, देवेंद्र बारगाजे, संदीप हुसे, सुहास मुंढे, युवराज राठोड, प्रकाश जायभाये, संतोष डोंगरखोस, अजित बुलबुले, दिपक वैद्य, प्रकाश इंगळे, डॉ. विशाल धानुरे, विनोद यादव, सुंदरलाल कुमावत, सुरेश सदगुरे, गणेश सुपारकर, राजु पवार, रमेश जाधव, दुर्गेश काठोटीवाले, घनशाम खाकीवाले, बाला परदेशी, गणेश सराशे, मधुकर झरेकर, बालासाहेब घनवट, परमेश्वर ढवळे, मो. अन्सारी, रोहीत बनवसकर, मधुराज डोईफोडे मंगलबाई खांडेभराड, प्रा. रेणुका भावसार व सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *