जालना (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील हे मराठवाडयाचा दौऱ्यावर असून दि. 4 जून शुक्रवार रोजी जालना जिल्ह्याचा दौऱ्यावर येत आहे. या निमित्ताने जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने दुपारी 4.30 वाजता येथील संत भगवान बाबा मंगल कार्यालय जुना जालना येथे महत्वाची बैठक बोलविण्यात आली आहे. सदरील बैठकीत मरठा आरक्षण प्रकरणी सर्वेाच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि महाविकास आघाडी सरकारची भूमिका या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.
डॉ. संजय लाखे पाटील हे मराठा आरक्षण प्रकरणी सर्वेाच्च न्यायलयाने दिलेल्या निर्णया संदर्भात दि. 1 जून ते 5 जून पर्यंत मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यात मार्गदर्शन करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. दि. 4 जून रोजी जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित बैठकीत डॉ. संजय लाखे पाटील हे सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. याप्रसंगी जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आ. कैलास गोरंट्याल, आ.राजेश राठोड, माजी आमदार, आजी माजी प्रदेश पदाधिकारी जिल्ह्यातील विविध आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदि मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत उपस्थित राहणारचे आवाहन जालना कॉग्रेस कमिटीचे जिल्हा कार्यध्यक्ष राजेद्र राख, शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद, न. प. गटनेते गणेश राऊत, तालुका अध्यक्ष वसंत जाधव, जिल्हा सरचिटणीस राम सावत, विजय चौधरी, चंद्रकांत रत्नपारखे आदींनी केले आहे.
Leave a Reply