आपन गेल्या आठवडयात बघीतले की कलम 80- सी म्हणजे काय ? आज आपन बघणारा आहोत की कलम
80 सी मध्ये कोण कोणत्या बाबी येतात की ज्याच्यात पैसे गुंतवले तर ते पैसे इन्कमटॅक्स मध्ये वजावटीस
पात्र ठरतात. हे आपन नेहमी प्रमाणे सोप्या भाषेत प्रश्नोतर रुपात बघणार आहोत.
प्रश्न- कलम 80 सी मध्ये कोणकोणत्या बाबी येतात. आपल्याला 80 सी म्हणजे फक्त एल. आय. सी. व पी.
फ वाटते.
– कलम 80 सी मध्ये कोणकोणत्या बाबी येतात यालाच सोप्या भाषेत असे म्हणता येइल की कोण
कोणते खात्यात पैसे भरले तर ते वजावटीस कलम 80 सी खाली पात्र ठरतात.
1) सर्वात आधी लाइफ इन्शुरन्स प्रीमीयम
2) नॉन कम्युटेबल डीफरड एन्युइटी म्हणजे एखाघाला ठराविक दिले जाणारे पैसे किंवा पेंशन. याची
माहिती आपन पुढे बघणार आहोत.
3) पगारातून घेतली जाणारी डोफर्ड एन्युइटी
4) प्रोहीडन्ट फंड 1925 लागु आहे अशा फंडात कायदेशीर पैसे जमा करणे
5) १५ वर्षीय मान्यता प्राप्त (रेकाग्नाइजड) प्रोवीडंन्ट फंड मध्ये पैसे जमा करणे
6) लोन चे हप्ते सोडून कर्मचार्याचे मान्यता प्राप्त प्रोवीडंन्ट फंड मध्ये पैसे जमा करणे
7) घरासाठी घेतलेल्या कर्जाची हप्ते फेड
8) मान्यताप्राप्त सुपर एन्युएशन फंड मध्ये कार्मचार्याने भरलेले हप्ते
9) भारतसरकार व्दारा मान्यताप्राप्त योजनेत सदस्यता फीस भरल्यास वजावट मिळते.
10) सेहींग सप्टीफीकेट मध्ये पैसे भरने ज्याचा भारतसरकारच्या ऑफीसीयल गॅझेट मध्ये उल्लेख
असतो.
11) यू. टी. आय. च्या युलीप स्कीम मध्ये हप्ते भरल्यास वजावट मिळेल.
12) धनरक्षा प्लॅन चे एल. आय. सी. चे म्युचुअल फंड आहे त्यात पैसे भरल्यास वजावट मिळेला.
13) जीवनधारा आणि जीवन अक्षय योजनेत पैसे भरल्यास वजावट मिळेल.
14) कलम 10 (23 डी) मध्ये सुचीत केलेले म्युचुअल फंड चे इक्वीटी लींक इन्शुरन्स प्लान मध्ये जमा
केलेले पैसे
15) नोटीफाइड पेंशन फंड मध्ये जमा केलेले पैसे वजावटी पात्र.
16) नॅशनल हउसींग बँक द्वारा नोटीफाइड असलेली नोटीफाइड पेंशन फंड योजनेत जमा केलेले पैसे.
17) अशी पब्लीक सेक्टर कम्पनी जी घरासाठी दीर्घ कालीन लोन चे वाटप करते त्यात भरलेले हफ्ते
वजावटीस पात्र आहे.
18) टयुशन फीस जी युनिवरसीटी किंवा कॉलेज किंवा शाळेत भरली जाते याची आधिक माहिती
आपण पुढे बघणार आहोत.
19) घर खरेदी साठी किंवा बांधकाम साठी पैसे भरल्यास वजावटीस पात्र याची सविस्तर माहिती पुढे
बघणार आहोत.
20) इन्फ्रास्ट्रक्चर बॉण्ड मध्ये जमा केलेले पैसे
21) कलम 10 (23 डी) व्दारे म्युच्युअल फंड मध्ये जमा केलेले पैसे
22) ५ वर्ष किंवा त्या पेक्षा जास्त केलेले फीक्स डीपॉजीट रक्कम
23) नाबार्ड चे नोटीफाइड बॉण्ड ची सादस्यता (सबस्कीप्शन)
24) करनिधरित वर्ष 2008-09 पासुन वरिष्ठ नागरिक बचत योजनेच्या 2004 मध्ये गुंतवलेले पैसे
25) करनिधरित वर्ष 2008-09 पासुन पोस्ट ऑफिस टाइम डीपॉजीट रूल १९८१ मध्ये ५ वर्षीय
टाइम डीपॉजीट मध्ये गुंतवलेले पैसे
26) सुकन्या समृद्धी अकाउंट सिक्म मध्ये मुलीच्या नावाने भरलेली रक्कम वजावटीस पात्र आहेत.
27) करनिधरित वर्ष 2020-21 पासून केंद्रिय कर्मचार्याना नवीन वजावट देण्यात आली आहे. कलम
80 सीसीडी च्या तीन वर्ष किंवा जास्त काळासाठी जमा केलेली रक्कम कलम 80 सी च्या दिढ
लाखाच्या लीमीटमध्ये वजावटीस पात्र आहेत.
सहसा पब्लीक मध्ये आम धारना आहे की कलम 80 सी मध्ये चार-पाच बाबीच येतात परंतु
आपण बघीतले की या मध्ये पंचवीस पेक्षा जास्त बाबी समाविष्ट आहे.
आपण एल. आय. सी मध्ये पत्नी व मुलाचे पैसे भरले तर वजावट मिळते का अश्या अनेक प्रश्नांचे उत्तर
पुढील ह्प्प्यात बघणार आहोत जे सामान्य वाचकांना उपयोगी ठरावे.
सी.ए.गोविंदप्रसाद एस. मुंदडा
सी.ए.आकाशजी. मुंदडा
जालना
Leave a Reply