ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

चाळगेनगरात क्षुल्लक कारणावरून घरात घुसून चाकुने हल्ला 2 जण जखमी; तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

July 27, 202212:15 PM 17 0 0

जालना (प्रतिनिधी ) : जालना शहरातील अंबड रोडवरील चाळगेनगर गोकुळधाम येथील रहिवाशी गोविंद अशोक जंजाळ, आकाश अशोक जंजाळ व गयाबाई पुंजाराम जंजाळ या 3 जणांना शेजारी राहणार्‍या 2 जणांनी क्षुल्लक कारणावरून मारहाण केली. यातील एका जणावर चाकुने हल्ला करण्यात आला. यामध्ये 2 जण जखमी असून, त्यांच्यावर जालना जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 26 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता घडली.
जालना शहरातील चाळगेनगर गोकुळधाम येथील रहिवाशी गोविंद अशोक जंजाळ व मोनु महेंद्र शेडुते आजुबाजुला राहतात. 26 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून मोनु शेडुते याने काठीने मारझोड केली. तसेच गोविंद भांडण सोडविण्यासाठी गेले असता, त्यास मोनु शेडुते यांनी गोविंदच्या उजव्या हाताला चाकु मारला. व आकाश जंजाळ यांच्या ओठावर काहीतरी मारून जखमी केले. व अशोक पुंजाराम जंजाळ यांनाही मारझोड केली.

याप्रकरणी रेणुका अशोक जंजाळ यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात मोनु महेंद्र शेडुते व किरण महेंद्र शेडुते (रा. चाळगेनगर गोकुळधाम जालना ) यांच्याविरूध्द भादंवि कलम 324, 323,504, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ दिंगबर सवडे करीत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *