खोपोली : खोपोलीत आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्यांच्या समवेत या सोहळ्यास खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, पनवेल चे उपमहापौर तथा रिपाइंचे नेते जगदीश गायकवाड, तहसीलदार आयुब तांबोळी, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. याच ठिकाणी 30 वर्षांपूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते तेव्हा ही आठवले उपस्थित होते तेव्हा ते राज्याचे मंत्री होते.उपनागराध्यक्षा विनिता कांबळे यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली व प्रमुख भाषण करताना आठवलेंनी कवितांवर कविता सादर करीत उपस्तितांनी माने जिंकली.
व्यासपीठावर सेनेचे खासदार व आमदार असल्याने आठवले सेनेबाबत बोलणार नाहीत असे कसे होणार. भविष्याची भविष्यवाणी त्यांनी बोलून दाखवली व सव. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकत्र येऊ असे सूचक वक्तव्य केले. कार्यक्रम संपन्न झाल्यावर पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की 2024 मध्ये भविष्यात सेना, भाजप, आरपीआय च सरकार राज्यात येईल , उद्धव ठाकरे पुन्हा एकदा बँक टू पेवेलीयन होतील त्यांनी एनडीए मध्ये सामील व्हावे असे ते म्हणाले तर सरकार सेना, भाजप व आरपीआयचे येईल अशी त्यांचा आशा आहे असे ते म्हणाले.
Leave a Reply