ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

घानेवाडी येथे काँग्रेस पक्षाला खिंडार ग्रामपंचायत सदस्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

September 19, 202113:12 PM 10 0 0

जालना ः जालनातील मौजे घानेवाडी येथील काँग्रेस पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य रवी लोखंडे, संजय खरात, अजय लोखंडे, शिवाजी तात्या कावले, अभिजीत साळवे, आनंद साळवे या सदस्यांनी काँगे्रस पक्षाला कंटाळून माजी राज्यमंत्री अर्जुनरावजी खोतकर यांच्या भाग्यनगर येथील निवासस्थानी असंख्य कार्यकत्यासह भेट घेतली व शिवसेनेत प्रवेश केला. या सर्व प्रवेश कार्यकर्त्यांचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी स्वागत केले.


यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी ग्रामपंचायत सदस्य रवि लोखंडे यांच्याशी वैयक्तीक चर्चा करून मत जाणून घेतले. यावेळी प्रवेश कार्यकर्त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य रवी लोखंडे, संजय खरात, अजय लोखंडे, शिवाजी कावलेे या सदस्यांचा व आनंद साळवे, संभाजी कावले, गोपाल कावले, पवन पाटोळे, प्रताप भिसे, सचिन घोरपडे, नितीन घोरपडे, आशीष आरसूड, स्वरूप पाखरे या कांग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी उपजिल्हाप्रमुख पंडीतराव भुतेकर, सुनिल साळवे, राहुल गवारे संरपंच कुंभेफळ, हे उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *