ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालन्यात एन यु जे एम महाराष्ट्र च्या वतीने दर्पण दिन उत्साहात संपन्न

January 8, 202216:06 PM 46 0 0

जालन्यात एन.यु.जे.एम.महाराष्ट्रच्या वतीने एन.यु.जे.एम. महाराष्ट्रचे मार्गदर्शक शिवेंद्र कुमार व राज्य अध्यक्षा शितल कर्देकर यांच्या नेतृत्वात जिल्हा शाखा जालनाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात दर्पण दिन साजरा करण्यात आला. दर्पण दिनानिमित्त मधुर बँकेट हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात पत्रकारांच्या गौरव करण्यात आला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अंकुश आप्पा देशमुख, विशेष अतिथी जिल्हा सरकारी वकील एडवोकेट दिपक कोल्हे, प्रमुख उपस्थिती जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, मराठवाडा समन्वयक एन.यु.जे.एम. भरत मानकर, जिल्हा अध्यक्ष अर्पण गोयल, संपादक दैनिक आनंद नगरी रविंद्र बांगड, ज्येष्ठ पत्रकार मकरंद जहागीरदार, विधिज्ञ एडवोकेट महेश धनावत, एडवोकेट वराड देशपांडे, वर्ल्ड बुक रेकॉर्ड होल्डर व विदर्भ संपर्क प्रमुख विष्णू कदम याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रथम एन.यु.जे.एमचे जिल्हा अध्यक्ष अर्पण गोयल यांनी प्रस्ताविक पर भाषण करताना सांगितले की, सर्व प्रथम त्यांनी पत्रकारांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देत असताना त्यांनी सांगितले की सर्व पत्रकार बांधवांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे व सर्व पत्रकारांनी दर्पणकार बालशास्त्री जांबेकर यांच्या प्रमाणे इंग्रजांची जशी झुंज दिली त्या पद्धतीने आपल्या सर्व पत्रकार बांधवांनी अन्यायाविरुद्ध सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे व आपल्या लिखाणातून न्याय मिळवून दिला पाहिजे. पुढे गोयल म्हणाले जरी वृत्तपत्र हा लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभ असला तरी आज हा मजबूत पाया पोखरला जातोय ही वस्तुस्थिती पत्रकारांची लेखणीही तलवार पेक्षाही तीक्ष्ण आहे. अन्याय अत्याचार भ्रष्टाचार याविरुद्ध पत्रकारांनी लढताना फक्त लेखणी चालवावी समोरच्या बरोबर घायल होईल जे पत्रकार खऱ्या बातम्या देण्यास घाबरतात त्यांनी पत्रकारिता सोडून इतर व्यवसाय करावा असे रोखठोक विचार यावेळी बोलतांना मांडले. यावेळी बोलतांना त्यांनी एक कविता सादर केली ती अशी की,
खींचो न कमानो को,
न तलवार निकलो
जब तोप मुकाबिल हो
तो अख्बार निकालो
याप्रसंगी विचार मांडताना जिल्हा माहिती अधिकारी म्हणाले की, शासनाचा विविध योजना पत्रकारांसाठी आहे जसे की अधिस्वीकृतीधारक पत्रिका, बालशास्त्री जांभेकर पेन्शन योजना, शंकरराव चव्हाण आरोग्य योजना असा अनेक योजनांची माहिती याप्रसंगी त्यांनी दिली.
त्याचप्रमाणे पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू म्हणाले की आम्ही प्रशासनाची भूमिका मांडत असताना आम्हाला फक्त पुढे काय घडले तेच दिसते परंतु पत्रकारांना मात्र या घटनेची इतंभूत माहिती असते व पत्रकारांनी ती दर्पण कारण सारखे बातमीच्या माध्यमातून सामान्यांपर्यंत पोहचवली पाहिजे प्रशासनात काम करत असताना काही जर कमी जास्त वाटले तर पत्रकारांनी आपल्या बातमीच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले पाहिजे.
त्याचप्रमाणे जिल्हा सरकारी वकील पत्रकारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात खोट्या नोटीस येऊ शकतात काही लोकांच्या बातम्या छापल्या किंवा वस्तुस्थिती छापली पत्रकारांवर हल्ले होतात त्यामुळे पत्रकारांनी खचून न जाता या सर्व गोष्टींच्या सामोरे जाऊन त्याला सक्षमपणे उत्तर दिले पाहिजे.
या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण राऊत, गुलाब पाटील, अविनाश कव्हाळे, संजय भरतीया, संजय काठोडे, सहाय्यक माहिती अधिकारी अमोल महाजन, अनिलसिंग परदेशी, विकास बागडी, रवींद्र मुंडे, दिलीप पोहनेरकर, साहील पाटील, गंगाराव आढाव, संतोष भुतेकर, सोनाजी झेंडे, रूख्मनीकांत दिक्षीत, राहुल मुळे, कैलास फुलारी, मनीष नंद, अच्युत मोरे, विनोद काळे, सुनील खरात, आशिष रसाळ, अशोक मिश्रा, रवी शिंदे, दशरथ वाकोडे, लियाकत अली खान, ओमप्रकाश शिंदे, राजेश भालेराव, अनिल व्यवहारे, जावेद तांबोळी, रामेश्‍वर पडघन आदींची उपस्थिती होती. सदरील कार्यक्राचे सुत्रसंचालन रविकांत दानम यांनी केले तर आभार प्रदर्शन एन.यु.जे.एम.चे विदर्भ समन्वयक विष्णू कदम यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *