कल्याण : जेवण करताना सहा वर्षाच्या मुलाने लघूशंका केली म्हणून बापाने गरम चमच्याचे चटके देत अमानूष मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. कल्याण पूर्वमधील विजयनगर परिसरात सचिन कांबळे नावाचा इसम राहतो. त्याला सहा वर्षांचा मुलगा आहे. जेवण करताना त्याने लघूशंका केली म्हणून हैवान बापाने त्याला गरम चमच्याचे चटके देत अमानूष मारहाण केली. यामुळे सहा वर्षीय मुलाच्या मांडीवर आणि पार्श्वभागावर मोठमोठ्या जखमा झाल्यात. मुलाच्या अंगावर झालेल्या जखमा नातेवाईकांच्या निदर्शनास आल्या असत्या त्यांनी मुलाची विचारपूस केली. त्यावेळी मला बाबांनी चटके देऊन खूप मारलं, असं मुलाने नातेवाईकांना सांगितलं. मुलासोबत असं वर्तन का केलं असं विचारायल्या गेलेल्यांना देखील सचिन कांबळेने दमदाटी केली तसंच त्यांना पिटाळून लावलं.
सरतेशेवटी नातेवाईक महिला मुलाला घेऊन पोलिस स्टेशनमध्ये गेले. क्रुर बापाने मुलाला दिलेले चटके पाहून पोलिसांच्या डोळ्यात देखील पाणी आलं. सहा वर्षाच्या चिमुकल्याला अशा पद्धतीने स्वत:च्या जन्मदात्या बापाने वागणुक दिली? यावर पोलिसांना विश्वास ठेवणं कठीण गेलं.दरम्यान, याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शाहूराज साळवे यांच्या यांनी सांगितलं की, सचिन कांबळेला आम्ही ताब्यात घेतले आहे. मुलाने जेवण करताना लघूशंका केली याचा राग मनात ठेवून त्याने घरातील चमचा गरम केला आणि मुलाला चटके देऊन जखमी केले तसेच मारहाणही केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सचिन कांबळे याची तीन लग्नं झालेली आहेत. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुस:या पत्नीचाही मृत्यू झाला. दुसऱ्या पत्नीकडून हा लहान मुलगा आहे. सचिन हा बीएमसीमध्ये कामाला असल्याची माहिती मिळत आहे.
Leave a Reply