खोपोली – या गणेशोत्सवात जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या पदावर बढती मिळाली असून, खोपोली पोलिस ठाण्यातील पुरुष व महिला असे एकूण 11 जणांना बढती मिळाली आहे.पोलिस निरीक्षक शिरीष पवार व सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश अस्वर यांनी या सहकाऱ्यांना खांद्यावर त्यांच्या हुद्याच्या फिती लावून अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिस हवालदार पदी कार्यरत असणारे किरण शिर्के यांना सहाय्यक फौजदार पदी बढती मिळाली आहे तर महिला पोलिस नाईक अर्पिता खैर, चंदा गायकवाड, वैदेही सावंत यांनी महिला पोलिस हवालदार पदी बढती मिळाली आहे. तसेच महिला पोलिस शिपाई ज्योती हंबीर, आशा भोये, व भारती नाईक यांना महिला पोलिस नाईक पदी बढती मिळाली आहे आणि पोलिस शिपाई राजेंद्र खेडकर, नागेश वाघ, सतीश बांगर, व अजिंक्य पाटील यांची पोलिस नाईक पदी वर्णी लागली आहे. काल सायंकाळी खोपोली पोलिस ठाण्यामध्ये पोलिस निरीक्षक शिरीष पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी बढती मिळालेल्या हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना पवार व अस्वर या दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्या खांद्यावर हुद्याच्या फिती लावून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शेवटी या कर्मचाऱ्यांनी केक कापून एकमेकांना व सहकाऱ्यांना भरवत तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
Leave a Reply