ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मुंबईत फेसबुकद्वारे ५३ वर्षीय महिलेची साडे दहा लाखांची फसवणूक

February 9, 202114:26 PM 117 0 0

मुंबई : फेसबुकद्वारे ५३ वर्षीय महिलेशी मैत्री करून तिच्याकडून साडेदहा लाख रुपये लुटणाऱ्या नायजेरियन नागरिक असलेल्या सायबर भामटय़ासह आणखी एका महिलेला बोरिवली पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. या भामटय़ाने परदेशातून तीन कोटी रुपयांचे पार्सल पाठविल्याचा बहाणा केला. पार्सल दिल्ली विमानतळावर सीमा शुल्क विभागाने अडविल्याचे सांगून या महिलेकडून विविध कारणांसाठी पैसे काढून घेतले होते. प्रिन्स इफांयी मदुकासी (३०) आणि हेयो मेयिंग (२२) अशी या भामटय़ांची नावे आहेत.

तक्रारदार महिलेला गेल्यावर्षी मार्क या नावाने असलेल्या फेसबुक खात्यावरून ‘मित्र विनंती’ आली होती. त्यांनतर त्यांच्यात संवाद सुरू झाला. भारतात व्यवसाय करण्यासाठी तीन कोटी रुपयांचे एक पार्सल पाठविल्याचे या भामटय़ाने महिलेला सांगितले. दरम्यान, काही दिवसांनी दिल्ली विमानतळावरील सीमाशुल्क विभागातून सुनीता शर्मा नावाने अधिकारी बोलत असल्याची ओळख सांगणारा फोन महिलेला आला. तक्रारदार महिलेचा या तोतया अधिकारी महिलेवर विश्वास बसला. सुनीताने सुरुवातीला या महिलेला सीमा शुल्कापोटी दीड लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर मनी लाँड्रिंग शुल्क, पार्सल हस्तांतर शुल्क अशा विविध बहाण्यांनी भामटय़ाने या महिलेकडून आणखी पैसे उकळले. तक्रारदार महिलेने स्वत:चे दागिने गहाण ठेवून आरोपींना पैसे दिले होते. दरम्यान, विविध बहाण्यांनी आरोपींनी पैसे मागणे सुरू ठेवल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदार महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने बोरिवली पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

साहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल कुंभार यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांचा थांगपत्ता शोधून काढला. साहाय्यक पोलीस निरीक्षक कुंभार, पूनम काळे आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश शिवरकर यांच्या पथकाने सापळा रचून दिल्लीतून नायजेरियन नागरिकाला अटक केली. पोलिसांनी त्यांच्याजवळून १७ डेबिट कार्ड, १० बँक पासबुक, चार सिम कार्ड आणि दोन आंतरराष्ट्रीय सिम कार्ड हस्तगत केले. प्राथमिक तपासात त्यांची पाच ते सहा जणांची टोळी असल्याचे समोर आले आहे. तसेच त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *