ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

नागपुरात सतत हप्ता मागणाऱ्या गुंडाचा चौघांनी मिळून केला खून

December 30, 202014:49 PM 28 0 0

नागपूर : गांजा विक्री करण्याच्या संशयातून एकाला सतत हप्ता मागणाऱ्या गुंडाचा चौघांनी मिळून खून केला. ही घटना वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत श्रावणनगर परिसरात दुपारी घडली. यातील आरोपींविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. प्रकाश ऊर्फ पक्या भीम कोसरे (२१), विशाल ऊर्फ पल्ली पृथ्वीलाल गुप्ता (१९) आणि अजय यशवंत बोकडे (२०) सर्व रा. श्रावणनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून चौथा आरोपी १७ वर्षांचा अल्पवयीन आहे.

मोहम्मद आकिब शेख मोहम्मद सत्तार (२४), रा. हसनबाग असे मृताचे नाव आहे. तो ऑटो चालवायचा. त्याच्याविरुद्ध मारहाण करणे व दादागिरी करण्याचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींपैकी अल्पवयीन आरोपी हा गांजा विकतो. त्यामुळे आकिब हा नेहमी त्याला पोलिसांकडे पकडून देण्याची धमकी देऊन हप्ता मागायचा. हप्ता न दिल्यास तो मारहाण करायचा.

मृताने अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनाही एक लाख रुपये मागितले होते. पंधरा दिवसांपूर्वी आकिब अल्पवयीन आरोपीला आपल्या ऑटोत बसवून घेऊन गेला होता. त्यावेळीही त्याने हप्ता वसुल केला होता. आज मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आकिब हा श्रावणनगर परिसरात पोहोचला. त्यावेळी अल्पवयीन आरोपी आपल्या मित्रांसह बुद्धविहाराजवळ बसला होता. त्या ठिकाणी आकिबने स्वत:कडील चाकू काढून अल्पवयीन आरोपीला हप्त्यासाठी धमकावू लागला.

यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून अल्पवयीन आरोपीने आपल्या साथीदारांच्या मदतीने आकिबला पकडले व त्याच्याकडील शस्त्र हिसकावून त्याचाच खून केला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *